Agriculture Scheme : शेतकरी हिताच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा ; कृषीमंत्र्यांचे कृषी विभागाला निर्देश

शेतकऱ्यांना जी बियाणे पुरविण्यात येणार आहेत, त्याबद्दलही जागरुक रहावे. शेतकऱ्यांना उत्तमातील उत्तम बियाणे कसे उपलब्ध करून देता येईल, याकडेही कृषी विभागाने लक्ष देवून कार्यवाही करावी, असे सत्तार म्हणाले.
Abdul Sattar
Abdul Sattar Agrowon

Abdul Sattar पुणे : शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer Income) वाढून तो समृद्ध आणि समाधानी होईल, यासाठीच कृषी विभागाने (Agriculture Department) आपल्या सर्व योजनांची (Agriculture Scheme) प्रभावी अंमलबजावणी करावी.

तसेच यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी दिले आहेत. कृषी आयुक्तालय पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये सत्तार बोलत होते.

शेतकऱ्यांना जी बियाणे पुरविण्यात येणार आहेत, त्याबद्दलही जागरुक रहावे. शेतकऱ्यांना उत्तमातील उत्तम बियाणे कसे उपलब्ध करून देता येईल, याकडेही कृषी विभागाने लक्ष देवून कार्यवाही करावी, असे सत्तार म्हणाले. राज्यातील चारही कृषी विद्यापिठांनी सातत्याने संशोधन करुन बियाणे निर्माण करावी.

खाजगी बियाणे उत्पादक यांच्यासोबत बियाणांच्या बाबतीत निकोप स्पर्धा झाली, तर निश्चितच त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. तसेच आपल्या उत्तम संशोधनाचे कृषी विद्यापिठांनी योग्य ते मार्केटिंग करून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यत त्याची माहिती पोहोचवावी, असेही सत्तार म्हणाले.

Abdul Sattar
Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची पाहणी सुसाट; शेतकरी मात्र हताश

बोगस बियाणे उत्पादकांवर कडक कारवाई करा

राज्य सरकारच्या तसेच विद्यापिठाच्या अखत्यारीतील जमिनीवर कृषी विभागामार्फत शेतीचे नवनवीन प्रयोग राबवावे. या प्रयोगांची माहिती राज्याच्या सर्व भागातील शेतकऱ्यांना द्यावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणांचा पुरवठा होईल, याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे. तसेच बोगस बियाणे उत्पादकांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही सत्तार यांनी विभागाला दिले.

Abdul Sattar
Minister Abdul Sattar : नुकसानग्रस्तांना मदत देण्यास शासन कटिबद्ध : सत्तार

कृषीच्या विविध योजनांचा आढावा

निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, अन्नधान्य पिके खरीप हंगाम २०२३, राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास येाजना आदी योजनांची सविस्तर माहिती मंत्र्यांना दिली.

स्व.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगांवकर यांनीही प्रकल्पाबाबत माहिती दिली. तसेच बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीसंदर्भातील आढावा सत्तार यांनी घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com