
Mahila Shakti Scheme पुणे ः महिला शेतकऱ्यांप्रती (women Farmer) कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘ॲग्रोवन’च्या वतीने ‘ॲग्रोवन महिला शक्ती सन्मान योजना’ (Mahila Shkati Scheme) जाहीर केली आहे. ही योजना १० मार्च ते २१ जून दरम्यान असणार असून, या बक्षीस योजनेतून ५५ लाखांची तीन हजारांपेक्षा जास्त बक्षिसे मिळविण्याची संधी महिला शेतकऱ्यांना मिळणार आहे.
यामधील बंपर बक्षिसांमध्ये २ ई-बाइक, सोन्याची नाणी, स्मार्ट फोन, पैठणी साड्या, विविध शेती उपयोगी साहित्य आदी विविध बक्षिसांचा समावेश आहे.
शेतीमध्ये महिलांचा वाटा अनन्यसाधारण असून, या स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ योजना आखण्यात आली आहे. योजनेमधून आधुनिक शेतीची माहितीदेखील सादर करण्यात येणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी ‘ॲग्रोवन’मधून एक कूपन प्रसिद्ध होणार असून, १०० पैकी ९० कूपन कापून चिकटवून ॲग्रोवनच्या कार्यालयाला पाठवायचे आहे. यासाठी कूपनची मूळ प्रत आवश्यक असणार असून, याची झेरॉक्स ग्राह्य धरली जाणार नाही.
योजनेच्या नियम व अटी नियमितपणे ॲग्रोवनमधून प्रसिद्ध होत असतात. त्या वाचून स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. योजनेत सहभागी होण्यासाठी अधिक माहितीसाठी ९८८१५-९८८१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
...ही आहेत बक्षिसे
- बंपर बक्षीस - २-ई बाइक
- सोन्याची नाणी - १०
- स्मार्ट फोन -१२
- पैठणी साड्या -१००
- इस्त्री आणि एलईडी टॉर्च - २००
- फवारणी पंप - १ हजार
- स्टील हॉट पॉट - १ हजार
- फार्म टूल सेट - १ हजार १
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.