पाणीदार गावांसाठी ‘अमृत सरोवर योजना’

आगामी काळात पाणीटंचाई भेडसावू नये म्हणून जिल्हा प्रशासन विभागाकडून पावले उचलण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात ‘अमृत सरोवर योजना’ राबविली जात आहे.
Water Conservation
Water ConservationAgrowon

पुणे : आगामी काळात पाणीटंचाई (Water Shortage) भेडसावू नये म्हणून जिल्हा प्रशासन विभागाकडून पावले उचलण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात ‘अमृत सरोवर योजना’ (Amrut Sarovar Yojana) राबविली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ९० तलावांची निवड करण्यात आली आहे. त्यातील २५ तलावांच्या पुनरुज्जीवनाचे (Lake Revitalization) काम स्वातंत्र्यदिनापर्यंत (१५ ऑगस्ट) पूर्ण होणार आहे. या तलावांवर स्वातंत्र्यदिनी गावातील स्वातंत्र्यसैनिक, ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य, पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या हस्ते ध्वजवंदन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Water Conservation
‘हतनूर’चे वाहून जाणारे पाणी ओझरखेडा धरणात सोडा

केंद्र शासनाच्या ‘अमृत सरोवर योजने’च्या माध्यमातून पावसाचे पाणी भूगर्भात मुरवले जात आहे. त्यातून भूगर्भातील पाणीपातळी वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. १५ ऑगस्टपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात नवीन तलावांची निर्मिती करणे शक्य नाही. त्यामुळे सध्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, तर पुढील वर्षांसाठी नवीन ७५ तलावांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

Water Conservation
उजनी धरणाची पाणी पातळी ७५ टक्क्यांवर

जिल्ह्यातील काही गावांत अमृत सरोवरांची निर्मिती करता येत नसेल, त्या ठिकाणी उपलब्ध तलावातील गाळ काढणे, तलावाचे पुनरुज्जीवन करणे आदी कामे करून तलावातील पाणीसाठा वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या कामासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंधरावा वित्त आयोग, कृषी सिंचन योजना यांसह इतर योजनांचा निधी वापरला जात आहे.

जिल्ह्यात ४८ ठिकाणी कामे सुरू

‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत अमृत सरोवर योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात ७५ तलावांची निवड करण्यात येणार होती. मात्र, ९० तलावांची निवड करण्यात आली आहे. त्यातील ४८ ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे, तर त्यातील २५ तलावांचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे, असेही जिल्हा रोहयोच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com