POCRA : ‘पोकरा’द्वारे हंगामनिहाय नियोजनाचा प्रयत्न

राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा)माध्यमातून प्रत्येक गावात हंगामनिहाय शेती नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
POCRA Project
POCRA ProjectAgrowon

छत्रपती संभाजीनगर : राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा)माध्यमातून (POCRA Project) प्रत्येक गावात हंगामनिहाय शेती नियोजन (Agriculture Planning) करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

त्यासाठी राज्यभरातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना गावनिहाय ग्राम कृषी संजीवनी समित्यांची बैठक घेऊन गावपातळीवर हंगाम नियोजन आराखडा तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेशामधील जवळपास ५ हजार २२० गावांमध्ये ‘पोकरा’ योजना राबविली जाते. प्रत्येक हंगामनिहाय होणाऱ्या कृषी विभागाच्या आढावा बैठका केवळ बियाणे व खत नियोजनापुरत्या मर्यादित राहता कामा नये.

त्यासाठी गावपातळीवरून शेती पिकांचे आराखड्यातून सविस्तर नियोजन या बैठकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

त्यानुसार गाव पातळीवर हंगाम नियोजन आराखडा कसा तयार करावा, याविषयीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांमध्ये ग्राम कृषी संजीवनी समिती केंद्रस्थानी ठेवली आहे.

POCRA Project
Pocra Scheme : ‘पोकरा योजना' ३०२ गावांतील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

प्रत्येक गावाचा हंगामिहाय शेती नियोजन आराखडा तयार करताना कोणत्या आवश्यक मूलभूत माहितीची गरज आहे, ती सर्व माहिती ‘पोकरा’ ॲप व ग्राम कृषी संजीव विकासदर्शिकेद्वारे कशी उपलब्ध होऊ शकते,

POCRA Project
POCRA : ‘पोकरा’अंतर्गत डीबीटीद्वारे ९१ कोटींचे अनुदान जमा

त्यामधील २१ प्रकारची माहिती कशी आवश्यक आहे, याविषयीचे विवेचन मार्गदर्शक सूचनांमध्ये आहे. विभाग, जिल्हा, उपविभाग आणि तालुका स्तरावरून बैठकांचे संनियंत्रण अपेक्षित आहे.

एप्रिलमध्ये खरीप हंगाम पूर्व व सप्टेंबरमध्ये रब्बी हंगाम पूर्व बैठक घेणे अपेक्षित आहे. याशिवाय बैठकांचे नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या नोंदी प्रकल्पाच्या प्रशिक्षण ॲपमध्ये घेणे आवश्यक केले आहे.

ग्राम कृषी संजीवनी समिती बैठकीत ही चर्चा अपेक्षित...

- मागील वर्षाचा खरीप हंगाम आढावा

- गावातील शेतीसाठी पाण्याचा ताळेबंद

- जमीन सुपीकता वाढविण्यासाठी आवश्यक बाबी

- वीज वापरातील कार्यक्षमता सुधारणे

- मृदाविषयक माहितीच्या आधारे घ्यावयाच्या पिकांचे नियोजन

- हवामान अनुकूल तंत्रज्ञान

- जमिनीची सुपीकता वाढवण्याचे नियोजन

- हवामान अनुकूल वाहनाचे बीज उत्पादन बियाणे बँक, आराखडा तयार करणे

- पड जमिनीवर, नदी, नाला काठावर वनझाडे, फळबाग लागवड व जैविक कुंपणाचे नियोजन

प्रत्येक गावच्या शेतीचे नियोजन गावकऱ्यांनी करावे, असे अपेक्षित आहे. बदलत्या हवामानानुसार त्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हंगामनिहाय प्रत्येक गावच्या शेती नियोजन आराखड्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
- विजय कोळेकर, कृषी विद्यावेत्ता, पोकरा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com