Farm Pond Scheme : वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. बारामती कृषी उपविभागातील इच्छुक शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी महा-डीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन उप विभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
Farm Pond Scheme | Agriculture Irrigation Scheme | Farm Irrigation Scheme |
Farm Pond Scheme | Agriculture Irrigation Scheme | Farm Irrigation Scheme | Agrowon

बारामती : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत (Agriculture Irrigation Scheme) वैयक्तिक शेततळे (Farm Pond) या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. बारामती कृषी उपविभागातील इच्छुक शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी महा-डीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन उप विभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

Farm Pond Scheme | Agriculture Irrigation Scheme | Farm Irrigation Scheme |
Farm Pond Lining : प्लॅस्टिक फिल्मचा पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव मागवले

या योजनेंतर्गत बारामती तालुक्यात ७३.६० लाख, दौंड ः ३८.२३ लाख, इंदापूर ः ६५.८५ लाख व पुरंदर ः ८६.५६ लाख असे एकूण २६४.२४ लाख लक्षांक प्राप्त झाले आहेत. शेततळे अनुदानाच्या रकमेत ५० टक्के वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

Farm Pond Scheme | Agriculture Irrigation Scheme | Farm Irrigation Scheme |
Farm Pond Scheme : शेततळ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान ०.६० हेक्टर क्षेत्र असावे. शेततळ्याची जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळ्याच्या कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा.

५ टक्के दिव्यांग लाभार्थी असतील, तर उर्वरित पैकी ७० टक्के पुरुष व ३० टक्के महिला या प्रमाणात लाभ देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com