Micro Irrigation Scheme : सूक्ष्म सिंचनासाठी ‘महाडीबीटी’वर केलेले अर्ज महिनोन् महिने पडून

Agriculture Scheme : सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरणाचे लाभार्थी निवडीसाठी सुरू केलेल्या ‘महाडीबीटी’मुळे शेतकऱ्यांना सुविधा निर्माण झाल्याचा दावा होत असला तरी अनेक अर्ज महिनोन् महिने पडून राहत असल्याची वस्तुस्‍थिती समोर आली आहे.
micro irrigation
micro irrigation Agrowon

Agriculture Scheme Update : सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरणाचे लाभार्थी निवडीसाठी सुरू केलेल्या ‘महाडीबीटी’मुळे शेतकऱ्यांना सुविधा निर्माण झाल्याचा दावा होत असला तरी अनेक अर्ज महिनोन् महिने पडून राहत असल्याची वस्तुस्‍थिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्ज वर्षभरापासून लॉटरीमध्ये निवड झालेली नसल्याने तसेच पडून आहेत. या शेतकऱ्यांना किमान हंगामाच्या तोंडावर तरी निवड होऊन पूर्वसंमती मिळेल, अशी आशा लागलेली आहे.

सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. लॉटरीद्वारे यात लाभार्थ्यांची निवड व पूर्वसंमती अशी प्रक्रिया राहत असल्याचे सांगितले जाते.

लॉटरी काढताना विविध निकषांना प्राधान्य देऊन लाभार्थ्यांची निवड होत असते. सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरणासाठी महाडीबीटीवर राज्यात मोठ्या संख्येने अर्ज दाखल होत असतात.

micro irrigation
Irrigation Scheme : ‘सिंचन योजने’तून सोलापूरला मिळणार ७०० वैयक्तिक शेततळी

मात्र या निवड प्रक्रियेत अनेकांचे नाव महिनोन् महिने निवडल्या जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. कधी कधी तर नव्याने अर्ज दाखल केलेल्यांची निवड होऊन त्यांना लाभही मिळतो. तर अनेक जुने अर्जदार आपला नंबर लागेल याची प्रतीक्षा करीत थांबलेले राहतात. यामध्ये गरजवंत शेतकरीसुद्धा आहेत.

micro irrigation
Irrigation Scheme : साक्रीतील उपसासिंचन योजनांसाठी तरतूद करा : गावित

आता खरीप हंगाम सुरू होत आहे. यासाठी सूक्ष्म सिंचनाचा लाभ मिळणे आवश्यक आहे. पोर्टलवर शेकडो अर्ज असे पडून आहेत. पण लॉटरीमध्ये नावच येत नसल्याने त्यांच्यासमोर पर्यायही नाही. या दृष्टीने शासनस्तरावर विचार होण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

मी ८ एकर शेती करीत असून सिंचनाच्या उद्देशाने ठिबकसाठी गेल्या वर्षी अर्ज केलेला आहे. त्यानंतर आता तीन महिन्यांपूर्वी स्प्रिंकलरसाठी दुसरा अर्ज केला. अद्याप कुठल्याच अर्जाची निवड झालेली नाही. त्यामुळे पूर्वसंमती नाही. वास्तविक आम्हाला शेतीसाठी ठिबक, स्प्रिंकलरची खूप आवश्यकता आहे. त्यामुळेच निवडीची प्रतीक्षा करीत आहोत.
- स्वप्नील टेकाडे, सांगळद, ता. मोताळा, जि. बुलडाणा
मी नऊ एकर शेती कसतो. कपाशी, तूर, सोयाबीन अशी पिके घेतो. जवळपास वर्षभरापूर्वी अर्ज केला. अद्याप निवड नाही ना पूर्वसंमती मिळालेली आहे. कृषी विभागाकडे विचारणा केली. पण लॉटरीत निवड नसल्याचे कारण दिले जाते. आता काय करावे, असा प्रश्‍न आहे.
- अतुल डहाके, निपाणा, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com