Rabi Sowing : हरभरा बियाण्यासाठी अर्ज करा : चलवदे

नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड व कृषक भारती को-ऑपरेटिव्ह या बियाणे वितरण संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे.
Government Scheme
Government SchemeAgrowon

नांदेड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन २०२२-२३ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये (Rabi Season) हरभरा या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण (दहा वर्षांआतील वाण) या घटकांतर्गत नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड व कृषक भारती को-ऑपरेटिव्ह या बियाणे वितरण संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे.

Government Scheme
Rabi Jowar Sowing : रब्बी ज्वारी लागवडीचे पंचसूत्री तंत्रज्ञान

या अनुदानावरील बियाण्याचा लाभ घेण्यासाठी ता) २१ ऑक्टोबर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे. अर्ज केलेल्या लाभार्थ्‍यांना २५ रुपये प्रती किलो अनुदान देण्यात येते.

Government Scheme
Rabi Jowar : रब्बी ज्वारीतील पीक संरक्षणाचे सूत्र

तसेच हरभरा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत प्रती शेतकरी एक एकर मर्यादेत अनुदानावर बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये १० वर्षाआतील वाणास (राज विजय -२०२.फुले विक्रम, फुले विक्रांत, एकेजी -११०९ पीडीकेव्ही कांचन बीजी -३०६२ पुसा पार्वती, बीजीएम-१०२१६ पुसा ) रुपये २५ प्रती किलो व १० वर्षांवरील वाणास (जॉफी -९२१८ विशाल, दिग्विजय विजय, विराट) रुपये २० प्रति किलो अनुदान वगळता उर्वरित रक्कम महाबीज वितरकाकडे देऊन खरेदी करावे.

जिल्ह्यात कृषी विभागामार्फत हरभरा प्रमाणित बियाणे अंतर्गत ३२०२ क्विंटल बियाणे व हरभरा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत ११ हजार ९१९ क्विंटल बियाणे वाटप करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com