Animal Husbandry Scheme : ‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी १९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.
Animal Husbandry Department
Animal Husbandry Department Agrowon

पुणे ः पशुसंवर्धन विभागाच्या (Animal Husbandry Department) वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी (Government Scheme) पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी १९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Animal Husbandry Department
Animal Husbandry : पशुसंवर्धन विभागात कामांचा खोळंबा

नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वितरित करणे, शेळी-मेंढी गट वितरित करणे, १ हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वितरण व २५ अधिक ३ तलंगा गट वितरण, या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे.

Animal Husbandry Department
Animal Husbandry Department : पशुसंवर्धन विभागाचे सहा अधिकारी अखेर परतले

इच्छुकांनी https://ah.mahabms.com/webui/registration या संकेतस्थळावर किंवा एएच.एमएएचएबीएमएस मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे अर्ज करावा. अर्ज करताना दुग्धालय, कुक्कुटपालन किंवा शेळीपालन यापैकी स्वंतत्रतणे निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. अर्जदारांनी एखाद्या योजनेसाठी एकदा अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करू नये. हे अर्ज २०२५-२६ वर्षापर्यंत वैध राहण्यासाठी प्रतीक्षायादी तयार करण्यात येईल.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याच्या पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर, मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ केले आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्यासाठी मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अर्ज केल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक बदलणार नाही, याची दक्षता घ्यावी.

‘‘अधिक माहितीसाठी १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा,’’ असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com