क्रॉपसॅप योजनेस मान्यता

क्रॉपसॅप योजनेस मान्यता
CropSap SchemeAgrowon

मुंबई : कापूस (Cotton), भात, सोयाबीन (Soybean), उसासह फळपिकांवरील कीड (Fruit crop Prst ) आणि रोग सर्वेक्षण (Disease Survey)आणि सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) (Cropsap Scheme)अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, मका, ज्वारी, आणि ऊस तसेच आंबा, डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा, काजू, भेंडी आणि टोमॅटो या प्रमुख पिकांवरील कीड आणि रोगाच्या व्यवस्थापनासाठी एकत्रित कीड- रोग व सल्ला योजना राबविण्यात येते. ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना तसेच केंद्र सरकारच्या इतर योजनांच्या समन्वयातून एकात्मिक स्वरूपात राबविण्यात येईल. या योजनांद्वारे शेतीशाळांचे आयोजन करण्यात येईल. या योजनांमधून निधी खर्च करून आवश्यकता भासल्यास क्रॉपसॅप योजनेतून निधी देण्यात येईल. कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲप्लिकेशन आणि संगणक प्रणती वापरून अंमलबजावणी करण्यात येईल.

कीड आणि रोगांचे सर्वेक्षण करून त्यांच्या व्यवस्थापनाबाबत महाॲग्रिटेक प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे वनस्पती निर्देशांक आणि स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे विद्यापीठांतील तज्ज्ञांकडून विश्लेषण करून शेतकऱ्यांना देण्यात येणारा सल्ला मोबाईल ॲप आणि एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येईल. संबंधित पिकांच्या विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांवर कीड आणि रोगांचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीवर पोहोचण्यापूर्वी किंवा आर्थिक नुकसान पातळीजवळ सुरवातीपासून नेमून दिलेल्या गावातील पिकांचे नमुने घेतले जातील. या नमुन्यांची तपासणी आणि सर्वेक्षण काटेकोरपणे नियमित स्वरूपात तज्ज्ञांकडून करण्यात येईल. त्यांचे मार्गदर्शन व सल्ला प्राप्त झाल्यानंतर तो तत्काळ संबंधित पीक क्षेत्रातील गावात एसएमएसद्वारे देण्यात येईल. सभा, बैठका आणि प्रात्यक्षिकांद्वारेही माहिती देण्याची जबाबदार कृषी सहायक आणि कृषी पर्यवेक्षकांवर आहे.

या प्रकल्पांतर्गत आपत्कालीन निविष्ठांची उपलब्धता १ जुलैपासून उपलब्ध करून देण्यासाठी कामगंध सापळे, ट्रायकोडर्मा इत्यादींचे उत्पादन आणि पुरवठा होण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विभागाच्या जैविक कीटकनाशक उत्पादन प्रयोगशाळांना सूचना देण्यात येतील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com