Crop Insurance : पाच पिकांच्या पेरणी क्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र अधिक

परभणी जिल्ह्यातील स्थिती; सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरीचा समावेश
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२२) खरिपातील ५ लाख २० हजार २० हजार ९५१ पेरणी क्षेत्रापैकी शेतकऱ्यांनी ४ लाख ३५ हजार ५९६ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण (Crop Insurance Cover) घेतले आहे. यंदा ८५ हजार ३५५ हेक्टरवरील पिके विमा संरक्षणाविना (Crop Insurance Scheme) आहेत. सोयाबीन (Soybean), मूग (Moong), उडीद, ज्वारी, बाजरी या पाच पिकांचे विमा संरक्षित क्षेत्र हे पेरणी क्षेत्रापेक्षा जास्त आहे.

Kharif Sowing
Crop Insurance : चार लाखांवर शेतकऱ्यांना मिळाला पीकविम्याचा लाभ

पतंप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या सात पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी ६ लाख ६५ हजार २४० विमा प्रस्तावाद्वारे ४ लाख ३५ हजार ५९६ हेक्टरवरील पिकांसाठी २ हजार १५६ कोटी १८ लाख ४२ हजार ३०४ रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ४७ कोटी ७० लाख ९७ हजार ४४७ रुपये विमा हप्ता भरला आहे.

Kharif Sowing
Crop Damage : तीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

यंदा सोयाबीनचे विमा संरक्षित क्षेत्र पेरणीपेक्षा ६५ हजार ३९९ हेक्टरने जास्त आहे. मुगाचे विमा संरक्षित क्षेत्र पेरणी क्षेत्रापेक्षा १० हजार २४४ हेक्टरने जास्त आहे. उडदाचे विमा संरक्षित क्षेत्र पेरणीपेक्षा ३ हजार ८३ हेक्टरने अधिक, ज्वारीचे विमा संरक्षित क्षेत्र पेरणीच्या तुलनेत ५२४ हेक्टरने तर बाजरीचे विमा संरक्षित क्षेत्र पेरणीहून २२० हेक्टरने जास्त आहे. या पाच पिकांसाठी क्षेत्र सुधार गुणांक (एरिया करेक्शन फॅक्टर) लागू होईल. परिणामी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी कमी दराने विमा परतावा मिळेल.

कृषी विभागाकडील १५ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार, यंदाच्या खरिपात ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी ५ लाख २० हजार ९५१ हेक्टरवर (९७.३९ टक्के) पेरणी झाली. त्यात सोयाबीनची २ लाख ४९ हजार ७१७ पैकी २ लाख ६७ हजार १८९ हेक्टर (१०६.९९ टक्के), कपाशीची १ लाख ९२ हजार २१३ पैकी १ लाख ८७ हजार ६४७ हेक्टर (९७.६२ टक्के), तुरीची ४५ हजार ९५९ पैकी ४२ हजार ३३१ हेक्टर (९२.११ टक्के), मुगाची २७ हजार १७८ पैकी १५ हजार २०० हेक्टर (५५.९३ टक्के), उडदाची ९ हजार ४० पैकी ४ हजार ५२७ हेक्टर (४९.५६ टक्के), ज्वारीची ७ हजार ३३३ पैकी २ हजार ७२३ हेक्टर (३७.१४ टक्के), बाजरीची १ हजार १४७ पैकी २२३ हेक्टर (१९.१० टक्के) या प्रमुख पिकांचा समावेश आहे. यंदाचे पेरणी क्षेत्र अद्याप अंतिम करण्यात आलेले नाही. त्यामुळे आकडेवारीत बदल होऊ शकतात.

पीकनिहाय पेरणी क्षेत्र...विमा क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक...पेरणी क्षेत्र...विमा संरक्षित क्षेत्र...विमा प्रस्ताव संख्या

सोयाबीन...२६७१८९....३३२५८८...४०५६२४

मूग...१५२००...२५४४४...६८८१०

उडीद...४५२७...७६१०...२४४७३

ज्वारी...२७२३...३२४७...८८२५

बाजरी...२२३...४२५...१०१०

कापूस...१८७६४७...२९८३६...६३३९३

तूर...४२३३१...३६४४३...९३१०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com