Crop Damage : वंचित नुकसानग्रस्तांना ७५५ कोटींची मदत

राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पण एनडीआरएफच्या निकषांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.
Crop Damage
Crop Damage Agrpwon

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीमुळे (Wet Drought) बाधित झालेल्या पण एनडीआरएफच्या (NDRF) निकषांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ७५५ कोटी (Crop Damage) रुपयांची मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

Crop Damage
Crop Damage : पावसाने शेतांत पाणी

मात्र एनडीआरएफच्या निकषामध्ये या नुकसानीचे मोजमाप झाले नाही. परिणामी हे शेतकरी वंचित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक गुरुवारी मंत्रालयात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद,

Crop Damage
Sugarcane Crop : भाकसखेडा येथे ड्रोनद्वारे ऊस पीक फवारणी प्रात्यक्षिक

या जिल्ह्यांतील ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील ३६ हजार ७११.३१ हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील ७४ हजार ४४६ हेक्टर असे एकूण ५ लाख, ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल सरकारला प्राप्त झाला होता. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत प्रशासनाने मांडला होता. तो मान्य करण्यात आला.

Crop Damage
Crop Insurance : पीक नुकसानीबाबत तीन लाख दावे दाखल

गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद विभागास ९८.५८ कोटी, तर नाशिक, अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार ३५४.०७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वीच मान्यता दिली.

राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी ८ सप्टेंबर रोजी सुमारे ३४४५.२५ कोटी आणि ५६.४५ कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

आतापर्यंत सुमारे ३९०० कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे, काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरू असून, सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. हे ३० लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या ७५५ कोटींच्या निधीमुळे अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

- एकनाथ शिंदे,

मुख्यमंत्री

या जिल्ह्यांना होणार लाभ

औरंगाबाद १२६७९ हेक्टर

जालना ६७८ हेक्टर

परभणी २५४५.२५ हेक्टर

हिंगोली ९६६७७ हेक्टर

बीड ४८.८० हेक्टर

लातूर २१३२५१ हेक्टर

उस्मानाबाद ११२६०९.९५ हेक्टर

यवतमाळ ३६७११.३१ हेक्टर

सोलापूर ७४४४६ हेक्टर

एकूण क्षेत्र ५ लाख, ४९ हजार, ६४६.३१ हेक्टर

एकूण निधी ७५५ कोटी रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com