Water Conservation : जलसंधारणाची ‘बार्शीत सरशी’

दुष्काळीचा कलंक असलेल्या बार्शी तालुक्यासाठी उजनी धरणाचे पाणी योजना पूर्णत्वास न गेल्याने जणू मृगजळ ठरले.
Water Conservation
Water ConservationAgrowon

बार्शी : दुष्काळीचा (Drought) कलंक असलेल्या बार्शी तालुक्यासाठी उजनी धरणाचे (Ujani Dam) पाणी योजना (Water Scheme) पूर्णत्वास न गेल्याने जणू मृगजळ ठरले. मात्र मागील पाच वर्षांत या तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची (Jalyukt Shiwar Scheme) तब्बल ३० कोटींच्या निधीची कामे झाली.

Water Conservation
Ground Water Level : भूजल पातळीत सरासरीच्या तुलनेत वाढ

यातून पाणी अडण्याचे अनेक प्रकल्प झाले. त्यामुळे पाण्याच्या स्त्रोतांमधे पाणी आले, ज्यावर बागायती पिके बहरत आहेत. ज्या पिकांमधून शेतकऱ्यांच्या जीवात समृध्दी आली आहे. साधारण ३ हजार ३० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल आहे. उजनी प्रकल्पाने नव्हे, तर जलयुक्त शिवार योजनेच्या प्रकल्पांमुळे या तालुक्याच्या अनेक भागात जणू हरितक्रांतीची पहाट उगवली आहे.

Water Conservation
Water Tax: पाणीपट्टी परतावा विनाविलंब मिळावा

जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उभे राहिले आहेत. ते आनंदाने उदरनिर्वाह करीत आहेत. या योजनेचा कसा फायदा झाला, या संदर्भातील मते ‘सकाळ’शी बोलताना अनेक शेतकऱ्यांनी मांडली. तूर, सोयाबीन अशा पारंपारिक पिकांना बगल देत, ऊस, द्राक्ष, लिंबू, केळी याह अन्य नगदी पिके शेतकऱ्यांकडून घेतली जात आहेत. त्यातून शेतकऱ्यांच्या हातात चांगला पैसा खेळत आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण वाढले आहे.

गावागावांमध्ये शिवार फेरी झाली,पाझर तलाव, बंधारे आराखडा, गावाच्या पाण्याचे आराखडे तयार झाले,ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली, कामाच्या अंदाजपत्रकांची तालुका, जिल्हास्तरीय शासकीय यंत्रणांकडून मंजुरी मिळाली ई-निविदा पद्धतीने कामाचे वाटप झाले.

३ लाखांपासून २५ लाखांपर्यंत कामांचे वाटप झाले. या योजनेत मागील पाच वर्षांत सुमारे ३० कोटी रुपये बार्शी तालुक्यात खर्च झाले आहेत खर्च झालेल्या पैशाचा दुरुपयोग झाला नाही त्याचा फायदाच झाला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com