PM Kisan Scheme : पीएम’ किसान योजनेचा लाभ ‘टपाल’मध्ये मिळणार

पीएम किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाते ‘आयपीपीबी’मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या ‘आयपीपीबी’ कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
PM Kisan
PM KisanAgrowon

जळगाव : प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत (PM Kisan Scheme) पात्र शेतकरी कुटुंबास तीन हप्त्यात दोन हजार रुपयांप्रमाणे (PM Kisan Instalment) वर्षाला ६ हजार रुपये अनुदान (Farmer Subsidy) देण्यात येते. या योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे.

त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी बँक खाते (Bank Account) आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक आहे. यासाठी पोस्टमनच्या माध्यमातून गावातच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील ३७ हजार ८८० लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात तेरावा हप्ता जमा होणार नाही. यासाठी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतर्फे गावात येऊन ही सेवा देण्यात येणार आहे. यासोबतच ज्यांची खाते उघडलेली नाहीत, त्यांची खातेही उघडून देण्यात येणार आहेत. ते बँक खाते आधार क्रमांकाशी ४८ तासांत जोडले जाईल.

मोहीम सुरू...

पीएम किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाते ‘आयपीपीबी’मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या ‘आयपीपीबी’ कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

PM Kisan
Tomato Crop Management : शेतकरी नियोजन पीक : टोमॅटो

गावातील पोस्टमास्तर या लाभार्थ्यांना संपर्क करून ‘आयपीपीबी’मध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केल्याने ‘आयपीपीबी’मार्फत १ ते १२ फेब्रुवारीदरम्यान मोहीम राबविण्यात येत आहे.

‘आयपीपीबी’मार्फत राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावयाचे आहे. ही आधार सीडिंग पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे.

‘आयपीपीबी’मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा गावातील पोस्ट कार्यालयात असल्याने लाभार्थ्यांना इतरत्र जाण्याची गरज नाही, असे जळगाव विभागाचे डाकघर अधीक्षक बी. व्ही. चव्हाण यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com