Agriculture Scheme : सहा योजनांतून मिळणार विविध घटकांचा लाभ

मागेल त्याला शेततळे, फळबाग आणि इतर घटकांसाठी प्रचलित योजनांमधून लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Farm Pond Scheme
Farm Pond SchemeAgrowon

Agriculture Scheme मागेल त्याला शेततळे, फळबाग आणि इतर घटकांसाठी प्रचलित योजनांमधून लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक कृषी विभागाने (Agriculture Department) काढले आहे. या योजनांमधून मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक, तुषार सिंचन, शेततळ्याचे (Farm Pond) अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे आणि कॉटन श्रेडर देण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने सहा प्रकारच्या घटकांसाठी एक हजार कोटी रुपयांची नियतव्यय अर्थसंकल्पात मंजूर केला होता. कृषी संबंधित घटकांचा लाभ राज्य सरकारच्या प्रचलित योजनांमधून तसेच त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Farm Pond Scheme
Agriculture Schemes For Woman : महिला शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मागेल त्याला फळबाग, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक योजनेअंतर्गत मागेल त्याला ठिबक, तुषार सिंचन, मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेतून मागेल त्याला शेततळे,

एकात्मिक फलोत्पादन, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून मागेल त्याला शेततळ्याचे अस्तरीकरण, मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजना,

एकात्मिक फलोत्पादन विकास उपअभियानांतर्गत मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्रे उपलब्ध करून देण्यात येतील.

Farm Pond Scheme
Agriculture Scheme : शेतकरी हिताच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा ; कृषीमंत्र्यांचे कृषी विभागाला निर्देश

आधीच्या लाभार्थ्यांना मिळणार नाही लाभ

या विविध योजनांतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या योजनांचे निकष व योजनांच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना यंदाच्या आर्थिक वर्षात अनुदान वितरित करण्यात येईल. या आधी अन्य योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनांतील घटकांचा लाभ घेता येणार नाही.

...या घटकांचा मिळणार लाभ

- मागेल त्याला फळबाग

- मागेल त्याला ठिबक, तुषार सिंचन

- मागेल त्याला शेततळे

- मागेल त्याला शेततळ्याचे अस्तरीकरण

- मागेल त्याला शेडनेट, हरितगृह

- मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्रे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com