Water Purity : पाण्याच्या शुद्धतेसाठी ‘भूजल’ने केल्या १७८ प्रयोगशाळा

गेल्या पन्नास वर्षांत भूजल विभागाने उल्लेखनीय काम केले आहे. गाव पातळीवर भूजलाचे काम करणारी ही यंत्रणा आहे. आता या विभागाकडून जलजीवन मिशनचे काम हाती घेतले आहे.
Water scheme
Water schemeAgrowon

पुणे : गेल्या पन्नास वर्षांत भूजल विभागाने (Bhujal Department) उल्लेखनीय काम केले आहे. गाव पातळीवर भूजलाचे काम करणारी ही यंत्रणा आहे. आता या विभागाकडून जलजीवन मिशनचे (Jaljeewan Mission) काम हाती घेतले आहे. त्यामध्ये प्रति माणशी ५५ लिटर पाणी देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

Water scheme
Water Management : गाव पातळीवर पाण्याचा ताळेबंद ठेवणे आवश्यक

पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी १७८ प्रयोगशाळांचे जाळे निर्माण केले असून, राज्यातील सर्वात मोठे जाळे तयार करणारे हा विभाग आहे. तसेच या विभागात मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी लवकरच भरतीप्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे आश्‍वासन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त परिसंवाद आयोजित केला होता, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी ‘यशदा’चे महासंचालक एस. चोकलिंगम, साखर आयुक्त शेखर गायकवाड, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जलजीवन मिशनचे संचालक ऋषिकेश यशोद, युनिसेफचे वॉश स्पेशालिस्ट युसूफ कबीर, महाराष्ट्र सुदूर संवेदन व उपयोगिता केंद्राचे संचालक डॉ. सी. के. जोशी, गणेश पवार आदी उपस्थित होते.

Water scheme
Water Shortage : पाणीटंचाई कामासाठी २ कोटींचा निधी

या वेळी राज्यातील भूस्तर खडकाचा फोटो अल्बम, महाराष्ट्र राज्यातील नवीन पाणलोट नकाशाचा अॅटलास या पुस्तकाचे व अटल भूजल योजनाचे माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल म्हणाले, की भूजलाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, उपाययोजना करताना जीएसडीए विभागाचे काम कौतुकास्पद आहे. जीएसडीएच्या काही अडचणी आहेत, त्यात पदोन्नती हा मुख्य प्रश्‍न असून तो मार्गी लावला आहे. त्यानंतर निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी लवकरच मान्यता घेतली जाईल. कार्यक्रमात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी प्रास्ताविक केले. तर वरिष्ठ खोदन अभियंता रामदास आरेकर यांनी आभार मानले.

राज्यातील कोणत्याही विभागामार्फत दहा किंवा बारा जिल्ह्यांपुरते मर्यादित असे प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र विभागाचे काम हे लोकांच्या जगण्याशी निगडित होण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यातील ३५ जिल्ह्यांसाठी राबविणारा प्रकल्प राबविता येण्यासाठी प्रकल्प हाती घेण्याची आवश्यकता आहे. तसेच जनतेकडून स्वतहून पुढाकार घेत जलपुनर्भरणाची कामे हाती घेतली जातील अशा पद्धतीची जनजागृती होण्याची गरज आहे.
शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com