Government Scheme : योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ः विखे-पाटील

उत्पादनवाढीसाठी शेतीला यांत्रिकीकरणाची जोड दिली जात आहे. शेतकरीहितासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बांधावर पोहोचवाव्यात,’’ असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.
Radhakrushna Vikhe Patil
Radhakrushna Vikhe PatilAgrowon

नगर ः ‘‘उत्पादनवाढीसाठी शेतीला यांत्रिकीकरणाची (Agriculture Mechanization) जोड दिली जात आहे. शेतकरीहितासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना (Government Scheme) कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बांधावर पोहोचवाव्यात,’’ असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrushna Vkhe Patil) यांनी केले. संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे कृषी विभागातर्फे ट्रॅक्टर, रोटाव्हेटर व ब्लोअरचे वितरण करण्यात आले.

Radhakrushna Vikhe Patil
घराघरात नळ पाणीपुरवठा योजना पोहोचवणार ः दत्ता भरणे

विखे-पाटील म्हणाले, ‘‘नैसर्गिक संकट आणि आव्‍हानांवर मात करून शेतकरी कृषी क्षेत्रात प्रगती साध्‍य करीत आहे. कोविड काळात बळीराजा शेतामध्‍ये कष्‍ट करून जगाची भूक भागवीत होता. देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेलाही कृषी क्षेत्रानेच बळकटी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने विविध योजनांद्वारे कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणाला मोठे प्रोत्‍साहन दिले आहे. या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी सरकारबरोबरच कृषी विभागाचीसुद्धा आहे.’’ झरेकाठी येथील दादासाहेब वाणी यांना कृषी योजनेतून रोटाव्‍हेटर, सुभाष चकोर यांना ब्‍लोअर, पुष्‍पलता पाटील. नामदेव व्‍यवहारे, सोमनाथ डोळे यांना ट्रॅक्‍टर देण्यात आले.

‘अतिवृष्टिग्रस्तांना मदत या महिन्यातच’

‘‘अतिवृष्टीत नुकसान झालेल्या राज्‍यातील शेतकऱ्यांना मदत, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्‍याचा महत्त्वपूर्ण निर्णय नव्‍या सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी या महिन्‍यातच सुरू होईल,’’ अशी ग्‍वाही मंत्री विखे-पाटील यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com