Cashew Nut : रत्नागिरी बाजार समितीची काजू बी शेतीमाल तारण योजना

खरेदी करताना काजू बीची आर्द्रता ५ टक्के असणे अपेक्षित आहे.
Cashew Crop
Cashew CropAgrowon

Ratnagiri Cashew News : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती (Ratnagiri District Agricultural Produce Market Committee) व महाराष्ट्र कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही जिल्ह्यात काजू बी (Cashew Nut Mortgage Scheme) शेतमाल तारण योजना राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात शेतमाल तारण योजनेंतर्गत दीड कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

बदलत्या हवामानाचा परिणाम पिकावर झाल्याने काजूचे उत्पादन (Cashew Production) अल्प आहे. काजू बी एकाचवेळी बाजारात आल्यास दर कोसळतात, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यापेक्षा शेतकऱ्यांना काजू बी न विकता कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतमाल तारण ठेवता येते.

त्या दिवसाच्या बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के रक्कम तारण कर्ज १८० दिवसांकरिता (सहा महिने) वार्षिक सहा टक्के व्याजाने उपलब्ध करून देता येते.

Cashew Crop
Cashew Development Scheme : १३२५ कोटींच्या खर्चाची काजू विकास योजना लागू

खरेदी करताना काजू बीची आर्द्रता ५ टक्के असणे अपेक्षित आहे. शेतमाल तारण ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनी येताना सातबारा, आधारकार्ड झेरॉक्स, बॅंक खात्याचा तपशील जोडणे आवश्यक आहे.

या योजनेला दहा वर्षांपूर्वी सुरुवात झाली असली तरी सुरुवातीला एक दोन शेतकरीच याचा लाभ घेत होते; मात्र गेल्या पाच वर्षांपासून या योजनेकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

दरम्यान, सिंधुरत्न योजना शेतमाल तारण योजनेशी संलग्न करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जेणेकरून काजू बी प्रोसेसिंगच्या छोट्या युनिट्स धारकांनाही कर्ज वितरण करण्यात येणार आहे.

जर या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर पाच कोटी अर्थसाहाय्याचे उद्दिष्ट कृषी उत्पन्न बाजार समितीने निश्चित केले आहे.

Cashew Crop
Cashew Market : काजूगराला १००० ते १६०० रुपये किलोचा भाव
गतवर्षी काजू बी वर झालेल्या कीडरोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल तारण योजनेस अल्प प्रतिसाद लाभला होता. यावर्षी ही योजना राबविताना दीड कोटीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. शेतकऱ्यांनी अल्प दराने काजू न विकता शेतमाल तारण योजनेत सहभागी व्हावे.
पांडुरंग कदम, सचिव, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com