Integrated Aqua Park : 'इंटीग्रेटेड अॅक्वा पार्क'च्या उभारणीला केंद्र सरकारची मंजूरी

या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण ४४ कोटी ५० लाख रुपयांपैकी केंद्र सरकार ४० कोटी पाच लाख रुपयांचे योगदान देणार आहे.
Fisheries
Fisheries Agrowon

Fish Farming Scheme Dehradun: केंद्र सरकारने उधमसिंह नगर जिल्ह्यातील सितारगंज येथे 'इंटीग्रेटेड अॅक्वा पार्क'च्या (Integrated Aqua Park) उभारणीला मंजूरी दिली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत (PM Matsya Sampada Yojana) या पार्कची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण ४४ कोटी ५० लाख रुपयांपैकी केंद्र सरकार ४० कोटी पाच लाख रुपयांचे योगदान देणार आहे.

या प्रकल्पामुळे मत्स्य उत्पादनाला प्रोत्साहन मिळण्यासोबतच मत्यपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल, अशा विश्वास उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी व्यक्त केला आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही केंद्र सरकारद्वारा राबविण्यात येणारी एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत मत्स्य व्यवसायासंदर्भातील सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी राबविले जातात.

ही योजना मच्छीमारांना मस्त्य व्यवसायासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करते. याच हेतूने उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यात राज्यस्तरीय इंटीग्रेटेड अॅक्वा पार्कची उभारण्यात येणार आहे.

Fisheries
Fish Farming : मत्स्यशेतीसाठी कोणत्या माश्यांची निवड करावी?

योजनेची वैशिष्ट्ये -

इंटीग्रेटेड अॅक्वा पार्क प्रकल्पांतर्गत मत्स व्यवसायाशी संबंधित विविध विकास उपक्रमांना जोडण्यास मदत होते. ज्यामध्ये पंगेशिअस, तिलापिया हॅचरी, बायो फ्लॉक युनिट, रीक्रिक्युलेशन युनिट, शोभिवंत मासे उबवणी केंद्र आणि संगोपन युनिट, प्रक्रिया युनिट, प्रशिक्षण केंद्र, विलगीकरण युनिट या सारखी सुविधा मिळतात.

Fisheries
Fish Farming : बायोफ्लॉक तंत्राने मत्स्यबीज निर्मिती

काय आहे योजना -

मूल्य साखळीचे आधुनिकिकरण करण्यासह त्याला मजबूती देणे, हा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच मजबूत मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन फ्रेमवर्क तयार करणे यासह मत्स्यपालन व्यावसायिक आणि मत्स्यपालकांना आर्थिक सुबत्ता सुनिश्चित करणे. हा योजनेचा उद्देश आहे.

दरम्यान, उत्तराखंडला मत्स्यपालनाचे हब बनविण्यासाठी धामी सरकार विशेष भर देत आहे. याच हेतून उत्तराखंड सरकार क्लस्टर आधारित मत्स्यशेतीला प्रोत्साहन देत आहे. ज्यामुळे राज्यातील मत्स्य उत्पादनात वाढ करता येईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com