कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांची सरकारकडून फसवणूक

राज्यातील मागील व सध्याच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजना राबविल्या. परंतु तारखेची रकमेची व क्षेत्राची अट टाकून ७० टक्के शेतकऱ्यांची फसवणूक केली गेली.
Farmer Loan Waive
Farmer Loan WaiveAgrowon

नगर ः राज्यातील मागील व सध्याच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजना (Government Agriculture Scheme) राबविल्या. परंतु तारखेची रकमेची व क्षेत्राची अट टाकून ७० टक्के शेतकऱ्यांची फसवणूक (Cheating With Farmer) केली गेली. या दोन्हीही योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे मागील गेल्या आठ-दहा वर्षांपासून शेतकऱ्यांना पीककर्ज (Crop Loan) मिळत नाही. सर्व राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि सर्व खासगी बॅंका मात्र शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शासनाने एकरकमी परतफेड योजना राबवून सातबारा कोरा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Farmer Loan Waive Scheme)

Farmer Loan Waive
Farmer Loan Waive : प्रोत्साहन अनुदान पात्रतेच्या जाचक अटी रद्द करा

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे, पशुवैद्यकीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दादासाहेब आदिक, डॉ. नवले, शरद पवार, ईश्वर दरंदले, मनोज औताडे, इंद्रभान चोरमल, कडू पवार, अभिजित बोर्डे, साहेबराव चोरमल, दादा पवार, बाळासाहेब बडाख, पांडूभाऊ राऊत, अकबर शेख, फकीरचंद चोरमल आदींसह कार्यकर्त्यांनी नगर येथे जिल्हा अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकांची भेट घेऊ मागण्या केल्या आहे. नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मागील आठ ते दहा वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, कोरोना आदी नैसर्गिक आपत्तीबरोबर केंद्र व सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज थकली. सरकारने छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजना राबविल्या. परंतु तारखेच्या रकमेची व क्षेत्राची अट टाकून सत्तर टक्के शेतकऱ्याची फसवणूक केली गेली.

मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन

सदर दोन्हीही योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे मागील गेल्या आठ-दहा वर्षांपासून पीककर्जही मिळत नाही. राष्ट्रीकृत बँका, व्यापारी बँका (एचडीएफची, महिंद्रा आदी ), जिल्हा सहकारी बँकेसह सर्वच खासगी सहकारी बँका शेतकऱ्यावर वसुलीच्या माध्यमातून अन्याय करीत आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार वीस ते पंचवीस टक्के रक्कम घेऊन एक रकमी परत फेड योजना राबवावी. यात जिल्हा बँकाचाही समावेश करावा. तातडीने वित्त पुरवठा करावा, व कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी केली आहे. दखल घेतली नाही तर ठिय्या अंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com