CM Uddhav Thackeray resigns:मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राजीनामा; महाविकास आघाडी सरकार कोसळले

मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या राज्यातील राजकीय साठमारीचा आज अखेर शेवट झाला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Chief Minister) दिला आहे.
Agrowon
AgrowonUddhav Thackeray

मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या राज्यातील राजकीय साठमारीचा आज अखेर शेवट झाला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला उद्या (गुरूवारी, ता. ३०) बहुमत सिध्द करण्यास सांगितले होते. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. राज्यपालांच्या (Governor) निर्णयाला शिवेसेनेने (Shivsena) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणी रोखता येणार नाही, असा निकाल दिल्याने सरकारला धक्का बसला. त्यानंतर लगेचच उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. आपल्याला मुख्यमंत्रीपद सोडण्याची अजिबात खंत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज मला विशेषतः शरद पवार आणि सोनिय गांधी आणि सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतांना फक्त चार शिवसेनेचे मंत्री होते. बाकीचे तुम्ही जाणताच. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं नामकरण धाराशीव केलं. या प्रस्तावांना कोणी विरोध केला नाही, सर्वांनी मान्यता दिली. ज्यांचा विरोध आहे हे भासवलं जात होतं त्यांनी पाठिंबा दिला,” असं म्हणत सहकारी पक्षांचे आभार मानले.

विरोधकांनी एक पत्र दिल्यानंतर राज्यपाल महोदयांनी २४ तासांत बहुमत चाचणीचा आदेश दिला, अशा शब्दांत राज्यपालांना टोला लगावला. त्यांनी राज्यपालांचेही आभार मानले. तसेच विधानपरिषदेच्या १२ आमदारांची यादी राज्यपालांनी मंजूर केली असती तर मान अधिक वाढला असता, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला.

कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी बंडखोरांचा आमच्यावर राग असेल तर आम्ही बाहेरून पाठिंबा देतो, अशी भावना व्यक्त केली होती, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी वापरायची की कामासाठी, असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला. “मला तो खेळच खेळायचा नाहीय. मला प्रमाणिकपणे असं वाटतं की शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्याचं पुण्य मिळत असेल तर ते त्यांना मिळू द्या,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

मुंबईत बंदोबस्त वाढवला आहे. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत लावली आहे. कुणीही शिवसैनिकांनी यांच्या मध्ये येऊ नये. नवीन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचे पुण्य त्यांच्या पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही, असे ठाकरे म्हणाले.

आपण मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहोत, अशी घोषणा उध्दव ठाकरे यांनी केली. तसेच आपण विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहोत, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी शेवटी मित्र पक्षांचे, सहकाऱ्यांचे आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com