
नगर : दुकानदाराच्या उन्मत्तपणामुळे सैनिकांची कुटुंबे आणि गरीब व्यक्तींना स्वस्त धान्य (PDS Grain) मिळत नव्हते. गावातील जागरूक नागरिकांनी दुकानदाराच्या मनमानीविरोधात लढा उभारला. जिल्हाधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळले. त्यामुळे ७८ कुटुंबांना दुसऱ्या स्वस्त धान्य (Ration Shop) दुकानदाराकडे जोडण्यात आले. या कुटुंबांनी कृतज्ञता व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
गोणेगाव (ता. नेवासे) गावातील काही कुटुंबे स्वस्त धान्यासाठी ज्या दुकानाला जोडण्यात आली होती, तो दुकानदार मनमानी पद्धतीने वागत होता. ग्रामस्थ धान्य खरेदीसाठी गेल्यावर दुकान बंद ठेवत असे. त्याच्या घरी विचारणा केल्यावर तो बाहेरगावी गेल्याचे सांगितले जात असे.
भाऊसाहेब रोडे, यासीन शेख, विठ्ठल कोराळे, प्रदीप रोडे, पप्पू शेख, धोंडिराम निकम, रमेश रोडे, बाबासाहेब रोडे, गणेश रोडे, रावसाहेब दिघे, साहेबराव रोडे, किशोर रोडे यांनी या दुकानदाराच्या विरोधात लढा उभारला. प्रशासनातील अधिकाऱ्यांना निवेदने दिली जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे नेवासे येथे प्रशासकीय कामानिमित्त गेले. भाऊसाहेब रोडे आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
दुसऱ्या दुकानदाराकडे नोंदविली नावे
जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाबाहेर थांबलेल्या ग्रामस्थांना आत बोलावून त्यांचा प्रश्न संवेदनशीलतेने समजून घेतला. सर्व ग्रामस्थांनी दुकानदाराच्या मनमानीविरोधात तक्रारी केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी या ग्रामस्थांना स्वस्त धान्यासाठी दुसऱ्या दुकानदारांकडे नावे जोडण्याचे निर्देश दिले.
ग्रामस्थांनी रानमळा येथील स्वस्त धान्य दुकानदाराचे व्यवहार चांगले असल्याने त्याच्याकडे नावे जोडण्याची विनंती केली. तहसीलदारांनी ही कार्यवाही केल्याने ग्रामस्थांनी नगरला येऊन जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.