
सांगली ः जिल्ह्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान (पीएम किसान) योजनेचे ४ लाख ३६ हजार ६४५ लाभार्थी आहेत. त्यापैकी ३ लाख २० हजार ४३१ लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून १ लाख १६ हजार २१४ लाभार्थ्यांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. प्रक्रिया प्रलंबित असलेल्यांनी ती तत्काळ पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत योजनेच्या (PM Kisan) लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी विशेष जनजागृती करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. योजनेचे वर्षासाठी २ हजार रुपयांचे तीन हप्ते असे एकूण वार्षिक ६ हजार रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहेत.
हप्ते पुढे सुरू ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांना स्वत: योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वैयक्तिकरीत्या ई-केवायसी पूर्ण करावी. तसेच शेतकऱ्यांना महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर ई-केवायसी करता येईल. ई-केवायसी पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांना पुढील हप्ता वितरित होणार नाही, असे केंद्र सरकारकडून कळविण्यात आले आहे.
तालुका एकूण लाभार्थी ई-केवायसी झालेले प्रक्रिया प्रलंबित
आटपाडी ३१८०१ २१८५० ९९५१
जत ७४३७३ ५७५२६ १६८४७
कडेगाव ३६८७१ २७५१६ ९३५५
कवठे महांकाळ ३०६४४ २३६९९ ६९४५
खानापूर २७३३१ १७७१६ ९६१५
मिरज ५८४१८ ३९४४७ १८९७१
पलूस २५४३२ १९३६२ ६०७०
शिराळा ३७६०६ २८५८३ ९०२३
तासगाव ४४२२८ ३२६८६ ११५४२
वाळवा ६९९४१ ५२०४६ १७८९५
एकूण ४३६६४५ ३२०४३१ ११६२१४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.