Crop Loan : पहिल्या टप्प्यात ३७ हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती

पहिल्या टप्प्यात या योजनेच्या ३७ हजार १६४ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड प्रमाणीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon

नगर ः पीककर्जाचे (Crop Loan) हप्ते वेळेवर परतफेड करणारे जिल्ह्यात २ लाख ३ हजार ७६९ शेतकरी आहेत. त्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेचा (Mahatma Phule Farmers Debt Relief Promotion Scheme) लाभ दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात या योजनेच्या ३७ हजार १६४ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Crop Loan
Farmer Incentive Subsidy : नियमित कर्ज फेडणाऱ्या सोळा हजारांवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ

या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड प्रमाणीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रमाणीकरणासाठी आपले सरकार सेवा केंद्रांकडून कोणतेही शुल्क शेतकऱ्यांकडून घेतले जाणार नाही, अशी माहिती जिल्हा सहकार उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.

Crop Loan
Farmer Loan : शेतकऱ्यांवर कर्जफेडीच्या ओझ्याखाली दबण्याची वेळ

राज्यातील आधीच्या महाविकास आघाडी सरकारने २ लाखांपर्यंतची कर्जमाफी योजना राबवली होती. ज्यांनी प्रामाणिकपणे कर्जफेड केली, अशा शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांची प्रोत्साहन लाभ योजना जाहीर केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या काळात या योजनेला मान्यता दिली. त्यानंतर सत्ता बदल झाल्यानंतर या योजनेला फेरमंजुरी देऊन अंमलबजावणी ही सुरू झाली आहे.

पहिल्या टप्प्यात ३७ हजारांवर शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकाची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत लाभ मिळणारे पारनेर तालुक्यात सर्वाधिक ४६ हजार ९२२ शेतकरी असून, पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या यादीत या तालुक्यातील ८ हजार ७०५ शेतकऱ्यांची नावे आहेत.

या खालोखाल संगमनेर तालुक्यातील २१ हजार ८८३ शेतकरी पात्र आहे. पहिल्या टप्प्यात या तालुक्यातील ४ हजार १९० नावे आहेत. तर अकोले तालुक्यात १३ हजार ८४४ असे जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे पात्र शेतकरी असून, यापैकी ३ हजार ३७० शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आली आहेत.

पात्र शेतकरी (कंसात पहिल्या टप्प्यातील लाभार्थी)

कोपरगाव- ७,४५७ (१३२५), जामखेड- ९४७० (२८८८), नगर-२८४१० (५१९६), कर्जत- १४३४८ (३५४८), पाथर्डी-२६१२८ (३८५२), नेवासे- ७०२१ (६०६), श्रीगोंदे- ८५६९ (८२४), राहाता-६२१२ (११९१), राहुरी-३७५८ (४७८) व शेवगाव-७१२० (७६१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com