Water Scheme : ‘अमृत योजने’तून दोन टीएमसी पाणी आरक्षित करण्याची मागणी

पुरंदर-हवेली मतदार संघातील वडाचीवाडी, औताडेवाडी, हांडेवाडी आणि होळकरवाडी या गावांचा टी. पी. स्कीमसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
खडकवासला धरण
खडकवासला धरणAgrowon

सासवड, जि. पुणे ः पुरंदर-हवेली मतदार संघातील वडाचीवाडी, औताडेवाडी, हांडेवाडी आणि होळकरवाडी या गावांचा टी. पी. स्कीमसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. याबाबत गुरुवारी (ता. १५) पीएमआरडीए (PMRDA) कार्यालयात आयुक्तांशी बैठक झाली.

खडकवासला धरण
Water Grid Scheme : वॉटर ग्रीड योजनेला २७४ कोटी मंजूर

रस्ते, ड्रेनेज आदी सुविधा पीएमआरडीएद्वारे केल्या जाणार असून, भविष्यातील वाढत्या नागरिकरणाचा विचार करून पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत (Jal Jeevan Mission) ‘अमृत योजने’द्वारे पाणी योजना (Water Scheme) करण्यासाठी खडकवासला धरणातील दोन टीएमसी पाणी आरक्षित करण्याची मागणी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महानगर आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

खडकवासला धरण
Water Bunds : धामणी नदीवरील माती बंधारा फुटला

पीएमआरडीएच्या आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत पीएमआरडीएमध्ये समाविष्ट झालेल्या पुरंदर व हवेली तालुक्यातील गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनींवरील आरक्षण, तसेच रस्ते, ड्रेनेज, वीज आणि इतर सुविधांबाबत चर्चा झाली. यामध्ये बोपगाव-गराडे (ता. पुरंदर) ग्रामीण मार्गासाठी ३ कोटी ५० लाखांचा डीपीआर तसेच पुरंदरमधीलच कुंभारवळण-मोरेवस्ती-जुना जेजुरी रस्त्यासाठी १ कोटी ७५ लाखांचा डीपीआर होत आहे.

याबरोबरच यामध्ये सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या पाणीपुरवठा सुविधेबाबत पीएमआरडीएमधील वडाचीवाडी, औताडेवाडी-हांडेवाडी, होळकरवाडी या गावांतील भविष्यातील वाढत्या नागरिकरणाचा विचार करून अमृत योजनेअंतर्गत पाणी योजनेच्या मागणीला पीएमआरडीए आयुक्तांनी तत्त्वत: मान्यता देऊन संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्ताव करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

पाणी योजनेसाठीच थेट खडकवासला धरणातून पाणी आरक्षित करण्याची मागणी व त्याबाबत संबंधितांना आदेश देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महानगर आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. यामुळे पीएमआरडीएमध्ये समाविष्ट झालेल्या गावांतील शेतकरी, नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांमुळे विश्‍वास निर्माण होईल.

-संजय जगताप, आमदार, पुरंदर-हवेली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com