
ठाणे : आंतरजातीय विवाहास (Inter-Cast Marriage) प्रोत्साहन देण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान (Incentive Subsidy) देण्यात येते. ही योजना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येते.
जिल्ह्यातील आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हा लाभ देण्यात येत असतो; मात्र मागील तीन ते चार वर्षे सरकारकडून या योजनेतील अनुदान प्राप्त न झाल्याने ४९६ जोडपी लाभापासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
जातीयवादाची दरी कमी करण्यासाठी राज्य सरकारने ऑगस्ट २००४ मध्ये आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली. देण्यात येणाऱ्या रकमेपैकी निम्मी रक्कम विवाहितांच्या नावाने अल्पबचतीत गुंतवण्यात येत होती. उर्वरित रकमेचे संसारोपयोगी साहित्य दिले जात होते.
आर्थिक साह्य देण्याची योजना
वाढती महागाई आणि बदलत्या काळानुसार पंधरा हजार रुपयांवरून ही रक्कम पन्नास हजार केली आहे. अस्पृश्यता निवारण योजनेचा एक भाग म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साह्य देण्याची योजना राबवण्यात येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.