Diwali Food Kit : ‘पिशव्यांविना’ रखडले दिवाळी किटचे वाटप

या किटमधील चारही जिन्नस रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र या योजनेचे लाभार्थी आहेत सहा लाख २० हजार अन् पिशव्या आल्या आहेत केवळ ४२ हजार. यामुळे जिन्नस येऊनही किटचे वाटप रखडल्याची स्थिती जिल्ह्यात आहेत.
Diwali Food Kit
Diwali Food KitAgrowon

जळगाव ः राज्य शासनाने रेशन दुकानामार्फत (Ration Shop) अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना (Ration Food Kit) दिवाळीनिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो हरभराडाळ, एक लिटर पाम तेल या चार शिधाजिन्नसांचा संच (दिवाळी किट) (Diwali Food Kit) शंभर रुपयांत शासनाकडून देण्याचा निर्णय घेतला.

Diwali Food Kit
Agrowon Diwali Ank: सह्याद्रीच्या शिखरावर झळकला अॅग्रोवनचा दिवाळी अंक

या किटमधील चारही जिन्नस रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र या योजनेचे लाभार्थी आहेत सहा लाख २० हजार अन् पिशव्या आल्या आहेत केवळ ४२ हजार. यामुळे जिन्नस येऊनही किटचे वाटप रखडल्याची स्थिती जिल्ह्यात आहेत. दिवाळी किटमधील जिन्नस (रवा, साखर, हरभराडाळ, पामतेल) व पिशव्या पुरविण्याचे कंत्राट शासनाने वेगवेगळ्या कंपन्यांना दिले आहे. यामुळे काही रेशन दुकानांत जिन्नसांपेकी काही वस्तू पोचल्या, काही पोहोचल्या नाहीत.

काही ठिकाणी सर्वच जिन्नस वस्तू पोहोचल्या, मात्र किट तयार करून देण्यासाठी पिशव्या नाहीत, असे चित्र जिल्ह्यात आहे. यामुळे जिन्नस पोचूनही पिशव्यांशिवाय दिवाळी किटचे वाटप रखडले आहे. रेशन दुकानांवर लाभार्थी येऊन दिवाळी किट आल्याची विचारणा करीत आहेत. मात्र पिशव्या नसल्याचे रेशन दुकानदारांकडून सांगितले जात आहे.

Diwali Food Kit
Government Scheme : चार लाख शिधापत्रिकाधारकांची दिवाळी होणार गोड

शुक्रवारपासून दिवाळीचे पर्व सुरू होत आहे. त्याअगोदर लाभार्थ्यांना दिवाळी किटचे वाटप पिशवीत एकत्र करून देण्याचे आदेश आहेत. सोबत पिशव्यांशिवाय किटवाटप करू नये, अशाही सूचना आहेत. यामुळे जिल्हा पुरवठा विभाग, रेशन दुकानदार किट देण्यात हतबल झालेले दिसत आहेत.

जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या सहा लाख २० हजार ६५० शिधापत्रिकांसाठी या निर्णयाचा लाभ होणार आहे. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्त भाव दुकानात दिवाळीपूर्वी जाऊन ई-पॉस मशिनवर आपला अंगठा प्रमाणित करून शिधाजिन्नस संच प्राप्त करून घ्यावेत. दुकानदाराकडून शिधाजिन्नस संच घेतल्याची पावती घेऊन संचात चार पाकिटे असल्याची खात्री लाभार्थ्यांना करावयाची आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी कंत्राटदाराकडून पिशव्या पोहोचल्या नाहीत. त्या उद्या (ता. २०)पर्यंत पोहोचतील. दिवाळी किट लाभार्थ्यांना पिशव्यांशिवाय देऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार सर्व जण कार्यवाही करीत आहेत. बहुतांश ठिकाणी जिन्नसवस्तू पोहोचल्या आहेत. पिशव्या उद्या पोहोचल्यानंतर लागलीच किटचे वाटप सुरू होईल.
सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com