Tribal Farmer : आदिवासी शेतकऱ्यांना फवारणी पंप वितरण

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत तेलबिया संशोधन केंद्रातर्फे भारतीय तीळ सुधार कार्यक्रमांतर्गत सातपुडा पर्वतातील आदिवासी भागात गारबर्डी (ता. रावेर, जि. जळगाव) येथे फवारणी पंपांचे वितरण करण्यात आले.
Tribal farmer
Tribal farmer Agrowon

जळगाव ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत (MPKV Rahuri) कार्यरत तेलबिया संशोधन केंद्रातर्फे (Oil Seed Research Center) भारतीय तीळ सुधार कार्यक्रमांतर्गत सातपुडा पर्वतातील आदिवासी भागात गारबर्डी (ता. रावेर, जि. जळगाव) येथे फवारणी पंपांचे वितरण (Distribution Of Agriculture Spay Pump) करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना कापूस, तीळ, सोयाबीन (Soybean), मका (Maize) आदी पिकांबाबत कीड-रोग व्यवस्थापन (Pest Disease Management) व इतर बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या वेळी केंद्रातील प्रमुख डॉ. संजीव पाटील, डॉ. गिरीश चौधरी, डॉ. भरत मालुंजकर, पाल) येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख महेश महाजन, अतुल पाटील आदी उपस्थित होते.

Tribal farmer
Agriculture Engineering : कृषी अभियांत्रिकीचे महत्त्व अन् भविष्यातील संधी

गारखेडा येथे निविष्ठा वाटप

तेलबिया संशोधन केंद्रातर्फे गारखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) या आदिवासी क्षेत्रात भुईमूग सुधार प्रकल्प (आदिवासी उपयोजना) अंतर्गत माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांना सोलर ट्रॅप, लॅम्प, अन्नद्रव्ये, जैविक खते आदींचे वितरण झाले.

अध्यक्षस्थानी रावेरचे आमदार शिरीष चौधरी होते. तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजीव पाटील, डॉ. सुमेरसिंह राजपूत, कडधान्य पैदासकार दिनेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या काही अडचणी, समस्या या वेळी ऐकून घेण्यात आल्या. त्यावर चर्चा झाली. तसेच पीकपाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी आपापल्या कुटुंबासाठी तीळ, भुईमूग, मूग, उडदाची पेरणी केल्याचे या वेळी दिसून आले. शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com