सिंदखेडराजा तालुक्यात ठिबक सिंचन अनुदान घोटाळा

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत खोटी बिले सादर करून कृषी खात्याचे अनुदान लाटण्याचा गंभीर प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात समोर आला आहे.
Drip Irrigation
Drip IrrigationAgrowon

अकोला ः पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत (Agriculture Irrigation Scheme) खोटी बिले सादर करून कृषी खात्याचे अनुदान (Irrigation Subsidy) लाटण्याचा गंभीर प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी सुनावणी झाली असून संबंधित विक्रेत्याकडून सुमारे ३५ लाख ७२ हजार ७७१ रुपयांची वसुली करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षकांनी दिले आहेत. शिवाय या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश मेहकरच्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Drip Irrigation
Irrigation : शेततळे, सूक्ष्म सिंचनासाठी १२६ कोटी रुपयांचा निधी

पंतप्रधान कृषी सिंचन योजना २०२१-२२ अंतर्गत अनुदान वितरणात हा गंभीर प्रकार समोर आला. याबाबत घेतलेल्या सुनावणीनंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिलेल्या आदेशात सिंदखेडराजा येथील ठिबक वितरक जय भवानी कृषी केंद्राचा संचालक सुरेश चव्हाण यांनी स्वतःवरील कर्ज कमी करण्यासाठी ड्रीप इंडिया या कंपनीकडील बनावट बिल सादर करून साठा वाढण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्ष कंपनीने इनव्हॉइसनिहाय पुरवठा दिला तो त्यानुसार जुळलेला नाही. कंपनी इंजिनिअर, प्रतिनिधीने जास्त ठिबकच्या सादर केलेल्या प्रस्तावावर व संकल्प आराखड्यावर सही सुद्धा केलेली नसल्याचे लेखी कळवले आहे.

Drip Irrigation
Drip Irrigation घोटाळ्याची फाईल कृषीविभागाने पुन्हा उघडली | ॲग्रोवन

या सिंचन साहित्याची मोका तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप संबंधिताने केलेला आहे. मात्र, २६ जुलैला जिल्हा अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीदरम्यान सिंदखेडराजा तालुक्यातील कृषी विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी असे पैसे घेतल्याचा आरोप शब्दात नाकारला. दुसरीकडे या प्रकरणात दुर्लक्ष झाल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी व विषय पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. तसेच जय भवानी कृषी सेवा केंद्राच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकाऱ्यांना जिल्हा अधीक्षकांनी दिले आहेत.

बुलडाणा जिल्हयात ड्रीप इंडिया इरिगेशन (नाशिक) व परेगॉन इरिगेशन प्रा. लि. या दोन कंपन्यांची २०२१-२२ या आर्थिक वर्षात नोंदणी केलेली आहे. मात्र, कंपनीकडून वितरकास प्राप्त झालेले साहित्य आणि लाभार्थ्यांना वितरित केलेल्या साहित्यात खूप मोठी तफावत आढळून आली आहे. यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.

संबंधित विक्रेत्याने हुबेहूब बिले सादर केल्याने हा प्रकार लक्षात आलेला नाही. जेंव्हा ही बाब समजली तेव्हा तातडीने वरिष्ठांना कळवले. या प्रकरणाची कृषी अधीक्षकांकडे सुनावणी झाली असून संबंधितांकडून जादा रकमेची वसुलीचे निर्देश आलेले आहेत. वरिष्ठांच्या आदेशाने पुढील कारवाई केली जात आहे.
वसंत राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा, जि. बुलडाणा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com