दीड लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडलेली

अमरावती जिल्ह्यातील शेतकरी मुकणार ‘पीएम’ किसान योजनेला
दीड लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडलेली
PM KisanAgrowon

अमरावती ः जिल्ह्यात तब्बल १.४५ लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया रखडली आहे. परिणामी या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) वार्षिक सहा हजार रुपयांच्या मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ शासकीय नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी घेतल्याची बाब समोर आल्यानंतर शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली. सुरुवातीला ई-केवायसीसाठी ३१ मार्चची डेडलाइन होती. त्यानंतर ३१ मे व आता ३१ जुलै ही अंतिम मुदत निश्‍चित करण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेचा ११ वा हप्ता मंगळवारी (३१ मे) पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत ३,१५,३९६ शेतकऱ्यांनी आधार संलग्नीकरण केले आहे. त्यामुळे त्यांना योजनेचा नियमित लाभ मिळणार आहे. काही शेतकऱ्यांनी योजनेच्या पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने ई-केवायसी प्रक्रिया होत नसल्याचे सांगितले.

१.४५ लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही

जिल्ह्यात १.४५,२८९ शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल, अशी भीती वर्तविली जात आहे. त्यामध्ये अचलपूर तालुक्‍यातील १२,४४४, अमरावती ११,५४२, भातकुली ८,१७३, चांदूररेल्वे ७,१४०, चांदूरबाजार १३,१३८, चिखलदरा ९,२८६, दर्यापूर ११,१७४, धामणगाव रेल्वे १०,३९२, धारणी ८,८८७, मोर्शी १३,०५९, नांदगाव १०,५४५, तिवसा ८,०३६, वरुड १२,१६० शेतकरी आहेत.

...अशी आहे लाभार्थी स्थिती

अचलपूर ः १३,५३९

अमरावती ः ८,२०१

अंजनगावसुर्जी ः १३,२८३

भातकुली ः ९,७६१

चांदूररेल्वे ः ९,२२८

चांदूरबाजार ः १७,६६६

चिखलदरा ः ४,५६३

दर्यापूर ः १५,३४७

धामणगाव ः ११,३०९

धारणी ः १०,६८१

ःमोर्शी ः ४,५९३

नांदगाव ः १५,७८४

तिवसा ः ९,०६७

वरुड ः १७,१५६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com