PM Kisan : २० हजारांवर शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकीच

PM Kisan E-KYC : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात २० हजार २८४ शेतकऱ्यांनी अद्यापही ही ई-केवायसी केलेली नाही.
PM Kisan Yojna News
PM Kisan Yojna NewsAgrowon

Washim News : जिल्ह्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात २० हजार २८४ शेतकऱ्यांनी अद्यापही ही ई-केवायसी केलेली नाही.

प्रलंबित लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. जे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना अनुदानाचे पुढील हप्ते मिळणार नाहीत.

शेतकऱ्यांनी लाभाचे हप्ते मिळण्यासाठी ई-केवायसी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत फलकावर लावण्यात आलेल्या आहेत.

ज्यांची ई-केवायसी शिल्लक आहे, अशा शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्राकडे आधारकार्ड व आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक घेऊन जावा.

PM Kisan Yojna News
PM Kisan : ‘किसान सन्मान’साठी पोस्टात आधार लिंकिंग सुविधा

तसेच ज्या लाभार्थ्यांच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसेल त्यांनी आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे आधार कार्ड आणि उपलब्ध असलेला दुसरा मोबाईल क्रमांक घेऊन जाणे आवश्यक आहे.

याशिवाय स्वत:ही लाभार्थ्याला कोणत्याही अँड्रॉइड मोबाईलवरूनही आधार ई-केवायसी करता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गावातील पोस्टमनकडे देखील उपलब्ध आहे.

ज्या लाभार्थ्यांचा बँक खात्यास आधार क्रमांक जोडणे बाकी असेल अशा लाभार्थ्यांनी गावातील पोस्टमनकडे आधार कार्ड घेऊन जावे. आपल्या बँक खात्याला आधार सिडींग जोडणी पूर्ण करावी.

PM Kisan Yojna News
PM Kisan Scheme : आधार सीडिंगसाठी २५ मेपर्यंत डेडलाइन

लाभार्थ्याने ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी मोड पीएम किसान पोर्टल किंवा मोबाईल ॲपवरून देखील करता येईल. https://pmkisan.gov.in हे संकेतस्थळ उघडावे.

त्यामध्ये फार्मर कॉर्नरला जाऊन ई-केवायसीवर क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक टाकावा. आधार रजिस्टर मोबाईल क्रमांक टाकावा. नंतर गेट ओटीपीवर क्लिक करावे. मोबाईलवर आलेला चारअंकी ओटीपी नंबर टाकावा.

नंतर आधार गेट आधार ओटीपीवर क्लिक करावे. मोबाईलवर आलेला सहाअंकी ओटीपी भरावा. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर ई-केवायसी हॅस बीन सक्सेसफुली डन असा संदेश स्क्रीनवर दिसेल.

अशा प्रकारे ई-केवायसी अपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन देखील निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com