Oilseed: तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी 'एनडीडीबी' करणार प्रयत्न

केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे (Shobha Karandalaje) म्हणाल्या की, खाद्यतेलाच्या (Edible Oil) बाबतीत आयातीवरील (Oil Import) अवलंबित्व कमी करण्यासाठी एनडीडीबीने (EDDB) घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
production of oilseeds
production of oilseedsAgrowon

देशातील सहकारी दूध चळवळीत अग्रेसर असलेल्या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने (National Dairy Development Board) आता खाद्यतेल उत्पादनात (Edible Oil Production) लक्ष घातले आहे. देशाला खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी देशभरात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी एनडीडीबी विशेष प्रयत्न करणार आहे. कर्नाटकातून (Karnataka) त्याची सुरूवात करण्यात आली आहे.

कर्नाटकात सूर्यफुलाचे उत्पादन वाढविण्यासाठी एनडीडीबीने मोहीम हाती घेतली आहे. एनडीडीबीने कर्नाटक ऑईलसीड फेडरेशन (केओएफ), कृषी विज्ञान विद्यापीठ, बेंगळुरू आणि भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैदराबाद यांच्यासोबत नुकताच यासंदर्भात सामंजस्य करार केला. सूर्यफुलाच्या KBSH-41 या संकरित वाणाचे व्यावसायिक उत्पादन घेण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा होणार आहे.

या सामंजस्य करारावर केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे, कर्नाटकचे कृषिमंत्री बी. सी. पाटील, कर्नाटक ऑईलसीड फेडरेशनचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले, एनडीडीबीचे अध्यक्ष मीनेश शहा आणि बेंगळुरूच्या कृषी विद्यापीठचे कुलगुरू एस. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या की, खाद्यतेलाच्या बाबतीत आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी एनडीडीबीने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. तेलबिया पिकांच्या बाबतीत चांगल्या गुणवत्तेचे बियाणे मिळणे ही मोठी अडचण आहे.

production of oilseeds
Incentive Grant : तेवीस हजारांवर शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ

सूर्यफूल हे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकाचे तेलबिया पीक म्हणून ते ओळखले जाते. रशिया-युक्रेन युध्द सुरू झाल्यानंतर सूर्यफुल तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला. कारण युक्रेन सूर्यफुलाचे उत्पादन घेण्यात जगात आघाडीवर आहे.

भारताचा विचार करता कर्नाटक राज्य सूर्यफूल उत्पादनात अग्रेसर आहे. एनडीडीबीने हाती घेतलेल्या या मोहिमेत म्हणूनच सूर्यफुलाला प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना वाजवी किंमतीत उच्च दर्जाचे बियाणे पुरवण्यात येणार आहे.

एनडीडीबीने कर्नाटक ऑईलसीड फेडरेशनच्या सहकार्याने यंदाच्या रबी हंगामात पाच हजार क्विंटल संकरित सूर्यफुलाचे बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. हे बियाणे सुमारे एक लाख हेक्टरवर सूर्यफुल पेरणी करण्यासाठी पुरेसे ठरेल.

केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवल्यामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांना सुर्यफुलाचे उत्पादन वाढवण्याची प्रेरणा मिळाली आहे, असे कर्नाटकचे कृषिमंत्री बी. सी. पाटील म्हणाले.

एनडीडीबी आणि दूध हे समीकरण सगळ्यांना माहित आहे. परंतु ऐंशीच्य दशकात सुध्दा एनडीडीबी खाद्यतेल उत्पादनाच्या क्षेत्रात उतरली होती. त्यावेळी ऑपरेशन गोल्डन फ्लो अंतर्गत दुधाप्रमाणेच खाद्यतेलासाठी सहकारी तत्त्वावर संस्था स्थापन करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. पण त्यात फारसे यश मिळाले नव्हते.

पुढील काळात सूर्यफुलाप्रमाणेच भुईमूग आणि मोहरी यांसारख्या तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी इतर राज्यांतही एनडीडीबीकडून उपक्रम राबविले जाणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com