Jalyukt Shiwar Scheme : समन्वयाने जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाचे विविध कामांचा तालुकानिहाय आढावा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला.
Jalyukt Shiwar Scheme
Jalyukt Shiwar SchemeAgrowon

Agriculture Irrigation छत्रपती संभाजीनगर : शासनाने जिल्ह्याला दिलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे (Jalyukt Shiwar Scheme) उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने गावनिहाय केलेल्या आराखड्याप्रमाणे मंजूर जलसंधारणाची (Water Conservation) कामे कृषी व जलसंधारण विभागाने समन्वयाने पूर्ण करावे. तसेच जलयुक्त शिवार २.० या अभियानास गती द्यावी, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आढावा बैठकीत सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाचे विविध कामांचा तालुकानिहाय आढावा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला. यामध्ये शेततळे, शेतातील बांधबंदिस्ती, फळबाग लागवड आणि नालाबंडिंग व इतर योजनेत करण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांबाबत संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या.

Jalyukt Shiwar Scheme
Jalyukt Shiwar : जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

‘मिशन अमृत सरोवर’ अंतर्गत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोखरा)मध्ये निवड करण्यात आलेल्या उर्वरित गावांचा आराखडा अंतिम करण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा देखील विचार करून सर्व विभागाने एकत्रित परिपूर्ण गाव आराखडा तयार करावा.

जिल्ह्यात जलसंधारणाच्या विविध योजनांची प्रभावी व समन्वयाने अंमलबजावणी करावी. प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या विविध जलसंधारणाची काम पूर्ण करून मार्च अखेर अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी पांडेय यांनी कृषी आणि जलसंधारण विभागाच्या प्रमुखांना सांगितले.

Jalyukt Shiwar Scheme
Onion Rate : कांद्याच्या माळा घालून उद्यापासून आंदोलन

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, दूरदृश्य प्रणालीद्वारे सिल्लोड सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, कन्नड उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, पैठण फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, औरंगाबादचे उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर रोडगे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी कार्यालयात तालुका अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा जलसंधारण अधिकारी पी. आर. देशमुख, जिल्हा जलसंधारण अधिकारी सूरज शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण अधिकारी पी. एम. शेलार उपस्थित होते. सर्व तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व जलसंधारण विभागाचे तालुकास्तरीय अधिकारीदेखील आढावा बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com