‘शेतकरी सन्मान’च्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे.
‘शेतकरी सन्मान’च्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ
PM Kisan Yojna NewsAgrowon

पुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Yojana) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी (e-KYC) करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. आता लाभार्थ्यांना ३१ जुलै २०२२ पर्यंत ई केवायसी करता येईल. यापूर्वी ही मुदत ३१ मे पर्यंत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जे शेतकरी ई-केवायसी करतील, अशाच पात्र लाभार्थ्यांना यापुढे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल.

जिल्ह्यात आजअखेर एकूण ४ लाख ९८ हजार ८० शेतकऱ्यांपैकी केवळ २ लाख ९८ हजार ६२३ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित २ लाख ७९ हजार ४५७ ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहेत. तरी या लाभार्थ्यांनी तत्काळ आपले ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com