
Farmer Laon Waive Scheme : जिल्ह्यात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत (Mahatma Jotirao Phule Farmers Loan Waive Scheme) अल्पमुदतीच्या कर्जाची नियमित परतफेड (Loan Repayment) करणाऱ्या नऊ हजार ३२१ शेतकऱ्यांना ३६ कोटी ५८ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
उर्वरित ३० हजार शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Loan Waive Scheme) २०१९ अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अल्पमुदतीच्या कर्जाची नियमित परतफेड केली त्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन योजना लाभ देण्याची घोषणा तत्कालीन सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली होती.
दरम्यान, याच काळात म्हणजेच २०२० मध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र राज्याची आर्थिक घडी विस्कटून गेली. परिणामी, ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना वितरित करता आले नाहीत. सध्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे.
या योजनेत नांदेड जिल्ह्यातील ६२ हजार ५०४ पात्र शेतकऱ्यांची यादी बँकेने अपलोड केली आहे. यातील ३२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकासह याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
त्यापैकी ३० हजार ७२० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. तर २ हजार १७९ शेतकरी आधार प्रमाणीकरणाचे बाकी असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आहे.
प्रोत्साहन योजनेमधील महत्त्वाच्या बाबी...
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी २०१७-२०१८, २०१८-२०१९, २०१९-२०२० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची फेड केली, तरच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
२०१७ २०१८ चे पीककर्ज ३० जून २०१८ पर्यंत पूर्णतः परतफेड करणे गरजेचे. २०१८, २०१९ या वर्षातील पीककर्ज ३० जून २०१९ पर्यंत पूर्णतः परतफेड करणे गरजेचे.
२०१९, २०२० चे कर्ज ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत फेडलेले असणे गरजेचे आहे. प्रोत्साहन योजनेचा लाभ देताना एखाद्या शेतकऱ्याने अनेक बँकाकडून कर्ज घेतलेले असेल अशावेळी एक किंवा अनेक बँकाकडून घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन ५० हजार या कमाल मर्यादेत लाभ मिळणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.