
दोंडाईचा, जि. धुळे : प्रलंबित प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजनेचे (Prakasha Burai Irrigation Scheme) काम वीस वर्षांपासून रखडले आहे. २०१९ पासून ५७० कोटी ८५ लाख रकमेच्या अद्ययावत सुधारित प्रशासकीय मान्यता शासनास पाटबंधारे प्रकल्प मंडळ धुळे यांनी सादर केली आहे. नागपूर अधिवेशनात सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करून रखडलेली कामे मार्गी लावावी, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांकडून लोकप्रतिनिधींना करण्यात आली आहे. यामुळे धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील २९ गावांचा पिण्याच्या पाण्याचा (Drinking Water) प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. दरम्यान सात हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचे सिंचन होणार आहे.
तापी नदीवरील प्रकाशा बॅरेजवरून ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. अवर्षण प्रणव भागातील क्षेत्रासाठी ही योजना शेतकऱ्यांना जीवनवाहिनी ठरणार आहे. बॅरेजच्या डाव्या बाजूला नंदुरबार तालुक्यातील हाटमोहिदा गावापासून पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे.
तेथून निंभेल, आसाणे, शनिमांडळमार्गे बुराई धरणात पाणी सोडले जाणार आहे. शनिमांडळपासून शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती धरणात दहा दलघमी पाणी टाकण्याचे आरक्षित केले आहे. ते पाणी नदीद्वारे नैसर्गिकरीत्या पाणी वाहून येत धरण भरण्याचा योजनेत सामावेश आहे.
याच टप्प्यातली पाइपलाइन ३२ किलोमीटर लांबीची आहे. बावीस वर्षांत जेमतेम संथगतीने पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यातील पाइपलाइनचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या योजनेची तीस टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले नाही. योजनेची प्रशासकीय मान्यता ११० कोटींची होती. २२ वर्षांत योजनेची किंमत पाच पटीने वाढली. योजनेवर आतापर्यंत १०९.६० कोटी रुपये खर्च झाला आहे. नंदुरबार तालुक्यातील ४३५१ हेक्टर सिंचनाचे नियोजन धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील २७३४ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचे नियोजन आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.