Crop Insurance : सांगलीत पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

गतवर्षी अवघ्या १४३३ शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळाली; मात्र, पिकांचे नुकसान होऊनदेखील पीक विम्याची भरपाई मिळत नसल्याने यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी विमा घेण्यासाठी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

सांगली ः यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) जिल्ह्यातील २४ हजार ९८ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा (Crop Insurance Scheme) घेऊन १३ हजार ७४३ हेक्टरवरील पिकांना संक्षरण (Crop Protection) दिले आहे. गतवर्षीच्या हंगामात ३४ हजार ५८४ शेतकऱ्यांनी विमा घेऊन २० हजार ४९५ पिकांना संरक्षण दिले होते. गतवर्षी अवघ्या १४३३ शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई (Crop Insurance) मिळाली; मात्र, पिकांचे नुकसान (Crop Damage) होऊनदेखील पीक विम्याची भरपाई मिळत नसल्याने यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी विमा घेण्यासाठी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांची संख्या १० हजारांनी कमी झाली आहे.

नैसर्गिक आपत्तीचा फटका पिकांना बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे. पीक विमा घेण्यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती केली जाते. विमा घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती असते. शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविल्यानंतर सरकारकडूनही काही प्रमाणात विम्याचा हप्ता भरला जातो. त्यामुळे शेतकरी पीक विमा घेण्यासाठी पुढे येतो.

Crop Insurance
Crop Insurance : विम्यासाठी ऑनलाइन झुंबड

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २४ हजार ९८ शेतकऱ्यांनी विमा घेऊन १३ हजार ७४३ हेक्टरवरील पिकांना संक्षरण दिले आहे. त्यापोटी शेतकऱ्यांनी ८२ लाख १ हजार ४९४ रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडे भरली आहे. वास्तविक, जिल्ह्यात गतवर्षीच्या हंगामात ३४ हजार ५८४ शेतकऱ्यांनी विमा घेऊन २० हजार ४९५ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले होते.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविम्यात ९२ लाख शेतकऱ्यांचा सहभाग

गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पिकांचे पंचनामे करून संबंधित विभागाकडे वर्गदेखील करण्यात आले; मात्र नुकसान भरपाई मिळालीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे; मात्र, गतवर्षी अवघ्या १४३३ शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळाली. भरपाईच्या जाचक अटी असल्याने शेतकरी विमा घेण्यासाठी पुढे येत नाहीत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात सर्व तालुक्यांतील शेतकरी संख्या कमी झाली असल्याचे चित्र आहे.

खरीप २०२१-२२ मध्ये पीक विमा घेतलेले तालुकानिहाय शेतकरी संख्या व क्षेत्र

तालुका....शेतकरी संख्या....क्षेत्र (हेक्टरमध्ये)

आटपाडी...१५१७...९११

जत...१६९७६...११८९१

कडेगाव...२३३...७८

कवठे महांकाळ...२०३९...१४८३

खानापूर...३२८४...१५०९

मिरज...२०१७...९५५

पलूस...२६६...१२७

शिराळा...२६७...३९

तासगाव...७१५७...३४७१

वाळवा...७३८...२२८

एकूण...३४५८४...२०४९५

खरीप २०२२-२३ मध्ये पीक विमा घेतलेले तालुकानिहाय शेतकरी संख्या व क्षेत्र

तालुका....शेतकरी संख्या....क्षेत्र (हेक्टरमध्ये)

आटपाडी...२४८२...१६४३

जत...१०१४५...७३०५

कडेगाव...२२२...६५

कवठे महांकाळ...११७८...५६६

खानापूर...२८४८...११३७

मिरज...१६२१...७१२

पलूस...५७५...२६८

शिराळा...३६...१५

तासगाव...४४२९...१८१०

वाळवा...५६२...२१५

एकूण...२४०९८...१३७४३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com