Subsidy : शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान लटकले

आधार प्रमाणीकरण करूनही कळंब तालुक्यातील बळिराजा प्रतीक्षेतच
crop lon
crop lonAgrowon

कळंब : राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी (Farmer) कर्जमुक्ती योजनेतंर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज (Loan) माफ करण्याची घोषणा केली होती. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता.

दिवाळीपुर्वी पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, एकाच शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन बँकेत नावाचा समावेश असलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे अनुदान लटकले आहे. त्यामुळे अनुदान कधी मिळणार असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे.

राज्य शासनाने मोठा गाजावाजा करत प्रोत्साहन अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होईल आणि शेतकरी दिवाळी आनंदाने साजरी करतील अशी घोषणा करण्यात आली होती. तालुक्यातील ८५ गावातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

crop lon
Kharif Crop Harvesting : खरीप पिकांच्या काढणी, मळणीची कामे वेगात

त्यानुसार लाभार्थ्यांनी आपले सरकार केंद्रावर आधार प्रमाणिकरण केले असून घोळ नसलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले पण दोन बँकेत एकाच नावाने असलेल्या यादीतील समावेशमुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यादीमधील नावापुढे आधार प्रमाणिकरण न करता महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या यादीमधील नावाचा शोध घेऊन आधार प्रमाणिकरण करण्यात आले.

या घोळात शेकडो शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान अद्यापही मिळाले नाही. प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासन प्रोत्साहन अनुदान केव्हा मिळणार, असा सवाल करीत आहेत.

एवढेच नव्हे, तर प्रोत्साहनपर अनुदान आपल्या बँक खात्यावर जमा झाले का याची विचारपूस करण्यासाठी बरेच शेतकरी बँकांच्या पायऱ्या झिजवीत आहेत. मात्र, त्यांना गेल्या पावलीच निराश होऊन परत जावे लागत आहे.

crop lon
Crop damage : नुकसानीची करा ऑफलाइन तक्रार

माझे नाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन बँकेच्या यादीत नावाचा समावेश आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या यादीमधील नावामुळे आधार प्रमाणिकरण केले. मात्र, अद्यापही बँक खात्यात ५० हजार रुपयाची रक्कम जमा झाली नाही.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखाधिकारी यांना विचारले असता दोन बँकेत नावाचा समावेश असल्याने अनुदान होल्डवर अडकल्याचे सांगण्यात आले.- गुंडेराव गंभिरे, शेतकरी इटकूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com