नुकसानीचे पंचनामे झाले, मात्र भरपाई मिळेना

मुळशी तालुक्यातील शेतकरी प्रतीक्षेत
नुकसानीचे पंचनामे झाले, मात्र भरपाई मिळेना
Crop InsuranceAgrowon

पुणे : मुळशी तालुक्यातील पीकविमा (Crop Insurance) घेतलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey ) कंपनीने केले; परंतु अद्यापही विमा कंपनीकडून भरपाईचे (Compensation) पैसे मिळालेले नाहीत.

गेल्या वर्षी २२ जुलैला मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला होता. त्या कंपनीने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणीदेखील केली; मात्र वर्ष होत आले तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही विम्याचे पैसे मिळाले नाहीत. श्री भैरवनाथ शेतकरी गट साठेसाई यांच्या वतीने व आबासाहेब शेळके आणि ज्ञानेश्‍वर डफळ यांच्या सहकार्यातून याबाबत मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावर पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन तहसीलदार यांनी दिले.

या वेळी शिवसेना नेते आबासाहेब शेळके, शिवसहकार सेनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर डफळ, श्री भैरवनाथ शेतकरी गटाचे अध्यक्ष पांडुरंग साठे, उपाध्यक्ष गणपत साठे, अंकुश साठे, ज्ञानेश्‍वर साठे, गणेश साठे, रमेश साठे, नामदेव खिलारी तसेच श्री भैरवनाथ शेतकरी गटातील सदस्य उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com