Agriculture Machinery : शेतकऱ्यांनी अनुदानावरील अवजारांसाठी अर्ज करावे

आदिवासी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर रसवंती मशिन व इतर आनुषंगिक साहित्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
Agriculture Mechnaization
Agriculture MechnaizationAgrowon

Farmer Subsidy : पैठण : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत सन २०२२-२३ मधील मंजूर आराखड्यानुसार आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर शेती अवजारे घेण्यासाठी तसेच अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना वैयक्तीक, सामूहिक लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी, जि. हिंगोली यांच्या नावे आवश्यक त्या कागदपत्रांसह मंगळवारी (ता. १४) ते मंगळवारी (ता. २८) या कालावधीत कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून अर्ज सादर करावेत, असे आवाहन कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे यांनी केले आहे.

Agriculture Mechnaization
Agricultural Mechanization : शेतीमध्ये यांत्रिकीकरण काळाची गरज

आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर शेती अवजारे घेण्यासाठी अर्थसाह्य करणे, तसेच आदिवासी लाभार्थ्यांना ८५ टक्के अनुदानावर रसवंती मशिन व इतर आनुषंगिक साहित्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी, आदिवासी लाभार्थ्यांना कृषिविषयक उद्योगाचे मार्गदर्शन व कार्यशाळा आयोजन करणे, आदिवासी लाभार्थ्यांना घरी विद्युत जोडणी करणे आणि वीज मीटर देणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी या रहिवासी प्रमाणपत्र, सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसील कार्यालय), आधार कार्ड प्रत, दारिद्र्यरेषेखाली, अपंग, विधवा, परितक्ता असल्यास प्रमाणपत्र, आधार जोडणी केलेल्या बँकेच्या पासबुकची प्रत, कुटुंबातील कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, सातबारा किंवा होल्डिंग प्रत, रेशन कार्ड आदी माहिती जोडणे आवश्यक आहे.

वरील योजनांमध्ये अंशत:, पूर्णत: बदल करण्याचे तसेच वरीलपैकी कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी, जि. हिंगोली यांनी राखून ठेवला आहे.

या प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांनी वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले व परिपूर्ण नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com