Agriculture Scheme : शासकीय कृषी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी केलेल्या अर्जाची परिस्थिती पाहण्यासाठी कृषी विभागाचे ऑनलाइन पोर्टल पाहणे आवश्यक आहे.
Agriculture Scheme
Agriculture SchemeAgrowon

Agriculture scheme Update संग्रामपूर, जि. बुलडाणा ः शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी केलेल्या अर्जाची परिस्थिती पाहण्यासाठी कृषी विभागाचे (Agriculture Department) ऑनलाइन पोर्टल पाहणे आवश्यक आहे.

जेणेकरून त्यांचा त्रास कमी होईल. शासनाच्या विविध योजनांचा (Government Scheme) तळागाळातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे केले.

Agriculture Scheme
Agriculture Scheme : कृषी योजनांसाठी ६.६९कोटींचे नियोजन

कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर दत्तक ग्राम येथे पळशी झाशी येथे झाले. या शिबिरात बौद्धिक सत्रात श्री. बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शांतीसाठी आध्यात्मिक जीवन स्वीकारावे, असे मत कृषी सेवक अजय निहाळे यांनी मांडले.

Agriculture Scheme
Agriculture Scheme : शेतीविषयक योजनांचा राज्यपालांनी घेतला आढावा

स्त्री ही जगत् जननी असून ती नसेल तर जगच राहणार नाही, असे मत मराठी विभाग प्रमुख प्रा. आनंद धुंदाळे यांनी मांडले. प्रा. डॉ. संजय टाले यांनी आपल्या उत्पन्नापैकी काही ना काही रक्कम बचत करायलाच पाहिजे, असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. सुरेश भालतडक यांनी विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्ये स्वीकारून आपले जीवन जगावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाला प्रा. सोनाली तायडे, अभयसिंह मारोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज वानखडे, प्रास्ताविक रोशन बोदडे, आभार शीतल मेहंगे हिने मानले. कार्यक्रमासाठी साक्षी जोशी, तेजस्वी डाबरे, दिव्या निंबोळकर, पूजा वाघ, प्रदीप अंदुरकर, श्रीकांत दाभाडे, निकिता चितोडे, विद्या ढगे यांनी पुढाकार घेतला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com