सिंचनासाठी वैयक्तिक शेततळ्याला अर्थसाहाय्य

अर्थसंकल्पातील घोषणेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
सिंचनासाठी वैयक्तिक शेततळ्याला अर्थसाहाय्य
IrrigationAgrowon

मुंबई ः शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन (Sustainable Irrigation) व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी कृषी सिंचन योजनेंतर्गत (Agriculture Irrigation Scheme) वैयक्तिक शेततळ्याचा (Farm Pond) समावेश करून अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय सोमवारी (ता. ६) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या ५० हजार रुपयांच्या अनुदानात ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना विविध आकारमानाच्या वैयक्तिक शेततळ्यासाठी शासनाने निश्चित केलेला खर्चाच्या मापदंडा एवढे किंवा ७५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, पिकांच्या शाश्वत उत्पादनाची व हमखास आर्थिक उत्पन्नाची खात्री मिळावी यासाठी अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी शेततळ्यासाठी अर्थसाहाय्याची घोषणा केली होती. या घोषणेस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

कृषी विद्यापीठांच्या जमिनींवर

सौर ऊर्जा प्रकल्प

राज्य शासनाची महामंडळे, कृषी विद्यापीठे यांच्या वापर नसलेल्या जमिनींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करून राज्यातील वीज वितरण कंपन्या अथवा तिसऱ्‍या घटकास प्रचलित कायदे नियमानुसार वीज खरेदी करार करून वीज विक्री करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय इमारतींवर यापूर्वी स्थापित केलेले पारेषण विरहित सौर ऊर्जा प्रकल्प महाऊर्जामार्फत पारेषण संलग्न करताना येणारा हायब्रीड इनर्व्हटर व नेट मिटरिंगचा खर्च ऊर्जा विभागाच्या अनुदानामधून करण्यास मान्यता देण्यात आली.

सौर/पवन ऊर्जा आधारित पथदर्शी तत्त्वावर एनर्जी स्टोअरेज प्रकल्प महाऊर्जामार्फत विकसित करण्यात तत्वत: मान्यता देण्यात आली व या संदर्भातील अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर फक्त हा मुद्दा मंत्रिमंडळासमोर अंतिम मान्यतेसाठी सादर करावा, असेही निश्चित करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com