Farmer Incentive Scheme : प्रोत्साहन अनुदानासाठी सांगलीची पहिली यादी

जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ७९५ शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळू शकणार आहे.
Farmer Incentive Subsidy
Farmer Incentive SubsidyAgrowon

सांगली ः जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ७९५ शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Mahatma Phule Farmer Loan Waive Scheme) देण्यात आलेल्या अल्पमुदत पीककर्जाची (Crop Loan) नियमितपणे परतफेड (Loan Repayment) करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळू शकणार आहे.

Farmer Incentive Subsidy
Incentive Grant : तेवीस हजारांवर शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ

यासाठी आधार प्रमाणिकरण केलेल्या जिल्ह्यातील ६२ हजार ६४२ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी मंगळवारपर्यंत (ता. १८) आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील ६२ हजार ६४२ शेतकऱ्यांची पहिली यादी ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास सोसायटी, सी.एस.सी. सेंटर/आपले सरकार सेवा केंद्र, सहायक निबंधक सहकरी संस्था यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांना पाहण्यास मिळेल. बॅंकांनी दिलेल्या याद्यांची छाननी पूर्ण झाली आहे.

Farmer Incentive Subsidy
Farmer Incentive subsidy : शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत मिळणार प्रोत्साहन अनुदान

आधार प्रमाणीकरणानंतर अंतिम याद्या प्रसिद्ध होऊन त्याचे चावडी वाचन होईल. त्यानंतर अनुदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बचत खात्यात २० ऑक्टोबरपूर्वी जमा केली जाण्याची शक्यता आहे. मृत्यू झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या वारसांनी बँकेमध्ये जाऊन वारसनोंद करून घ्यावी.

सर्व बँकांच्या शाखा, तालुक्यातील सहकार निबंधक, सहकारी संस्था कार्यालय व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय येथे मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. मुदतीच्या आत पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्राप्तिकर भरणारा, शासकीय नोकरदार, आमदार, खासदार, माजी मंत्री, २५ हजारांपेक्षा जास्त मासिक निवृत्तिवेतन असलेल्या व्यक्ती (शेतकरी) कर्जमाफीतून वगळण्यात आल्या आहेत. सर्व विकास सोसायट्या, बॅंकांच्या शाखांत अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. गावोगावी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर त्या याद्या लावून त्याचे वाचन होईल. २० ऑक्टोबरपूर्वी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे.

बॅंकनिहाय लाभार्थी...

(आधार प्रमाणीकरण केलेले)

जिल्हा बॅंक ५९,१४३

बॅंक ऑफ महाराष्ट्र १०३३

बॅंक ऑफ इंडिया ५७२

स्टेट बॅंक ऑफ इंडिया ३६८

युनियन बॅंक ऑफ इंडिया ३८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com