काजू, मोहफुलांच्या देशी मद्याला ‘विदेशी’चा दर्जा

राज्य शासनाची मान्यता; मूल्यवृद्धीसाठी पाऊल
काजू, मोहफुलांच्या देशी मद्याला ‘विदेशी’चा दर्जा
Mohful Liquor Agrowon

पुणे ः काजू बोंडे (Cashew) आणि मोहाफुलांपासून (Mohphul) स्थानिक पातळीवर उत्पादित करण्यात येणाऱ्या देशी मद्याला (Desi Liquor) प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी या मद्याला आता विदेशी मद्याचा दर्जा (Status Of Foreign Liquor) मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. विदेशी मद्य म्हटल्यास या मद्याच्या मूल्यवृद्धीस फायदा होईल, असा दावा सरकारद्वारे करण्यात आला आहे.

मोह आणि काजू बोंडापासून मद्यार्क निर्मितीद्वारे शेतकरी, महिला बचत गटांना रोजगाराचा आणि उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी देशी मद्यार्क निर्मितीला शासनाने परवानगी दिली आहे. मात्र स्थानिक पातळीवर निर्मिती होणाऱ्या या मद्यार्काला देशी मद्य संबोधले जाते. यामुळे या मद्याला मर्यादित ग्राहक आहेत. त्यामुळे विपणन आणि मूल्यवृद्धीस मर्यादा येत असल्याचे शासनाचे मत आहे. यामुळे या मद्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याबरोबरच मूल्यवर्धनासाठी विदेशी मद्याचा दर्जा शासनाकडून देण्यात आला आहे.

हे मद्यार्क करताना, फळे फुलांच्या उपलब्धतेनुसार कमी मद्यार्क उत्पादित झाल्यास, अशा परिस्थितीत दुसऱ्या फळे, फुलांपासून उत्पादित मद्यार्कामध्ये मिश्रण करण्यास मुभा राहील. मात्र या मद्यात इतर मळी व धान्याचा वापर करून विदेशी मद्य बनविता येणार नाही. तसेच फळे, फुलांपासून बनविलेल्या मद्यार्कामध्ये मळी, धान्यापासून बनविलेले मद्यार्क मिश्रण करता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com