PM Kisan : किसान योजनेच्या ई-केवायसी, ‘आधार’पासून चार लाख शेतकरी दूर

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपये मिळतात. मात्र पुणे जिल्ह्यातील २ लाख ६२ हजार ९६३ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण आणि १ लाख १४ हजार ५१६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची आधार जोडणी नसल्यामुळे अडचणी येत आहेत.
PM Kisan
PM KisanAgrowon

पुणे : पीएम किसान योजनेच्या (Pm Kisan Scheme) माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपये मिळतात. मात्र पुणे जिल्ह्यातील २ लाख ६२ हजार ९६३ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण (e-KYV Validation) आणि १ लाख १४ हजार ५१६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची आधार जोडणी (Adhar Linking) नसल्यामुळे अडचणी येत आहेत. त्या अडचणी दूर करण्यासाठी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी जोडण्याचे काम मोहीमस्तरावर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिले.

पीएम किसान योजनेच्या आढाव्याबाबत दूरदृश्‍य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन बुधवारी (ता.२७) करण्यात आले होते. त्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे आदी उपस्थित होते.

PM Kisan
PM Kisan : पंतप्रधान सन्मान योजनेच्या ‘ई-केवायसी’चे सर्व्हर डाउन

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. आतापर्यंत ५ लाख १४ हजार २४६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ८९६ कोटी ३५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविणे हा शासनाचा उद्देश आहे. तथापि, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार बँक खाते आधार क्रमांकाला न जोडल्यास आणि लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण न झाल्यास यापुढील लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे हे काम प्राधान्याने करणे गरजेचे आहे. त्यासाठी १० ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवावी.’’

PM Kisan
PM kisan : राज्यभर ‘पीएम-किसान’ची ‘केवायसी’ पडताळणी सुरू

जिल्ह्याने योजनेबाबत केलेल्या कार्यवाहीचा देशपातळीवर सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याबाबत दक्षता घ्यावी. कृषिमित्रांनी संकलित केलेल्या माहितीला महसूल अधिकाऱ्यांनी प्रमाणित करावे.

गावनिहाय लाभार्थ्यांच्या याद्या महा-ई-सेवा केंद्र आणि सामान्य सेवा केंद्रांना देण्यात आल्या आहेत. कृषिसेवक, ग्रामसेवक आणि महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या गावांसाठी नियोजन करून कालमर्यादेत काम पूर्ण करावे. स्वयंनोंदणी केलेल्या १ लाख ३५ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या माहितीची त्वरित तपासणी करण्यात यावी.

श्री. खराडे म्हणाले, ‘‘लाभार्थ्यांच्या याद्या चावडीवर ठेवण्यात याव्यात. लाभार्थ्यांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचविण्यात यावी. लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार जोडणीचे काम वेगाने पूर्ण करावे. ई-केवायसी वेळेत न झाल्यास पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.’’

शेतकऱ्यांना आवाहन

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘‘ई-केवायसी व आधार जोडणी वेळेत न झाल्यास पात्र शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणार असल्याने शेतकऱ्यांनी या कामी यंत्रणांना सहकार्य करावे. शेतकऱ्यांनी जवळच्या महा-ई-सेवा किंवा सीएससी केंद्रात जाऊन नोंदणी पूर्ण करावी.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com