Government Scheme : चार लाख शिधापत्रिकाधारकांची दिवाळी होणार गोड

उत्सवांच्या काळात वाढत्या महागाईचे चटके जनतेला बसत आहेत. राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना अवघ्या १०० रुपयांत रवा, साखर, चणाडाळ आणि तेल देण्याचा निर्णय घेतला आहे.
Ration Shop
Ration ShopAgrowon

वसई : यंदा कोरोनाचा (Corona Disease) प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने सण-उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे होत आहेत. मात्र, उत्सवांच्या काळात वाढत्या महागाईचे (Inflation) चटके जनतेला बसत आहेत. राज्य सरकारने (State Government) शिधापत्रिकाधारकांना (Ration Card Holders) अवघ्या १०० रुपयांत रवा, साखर, चणाडाळ आणि तेल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा पालघर जिल्ह्यातील ४ लाखांहून अधिक शिधापत्रिका धारकांना मिळाला आहे.

Ration Shop
Ration Shops : रेशन दुकानांना ‘कार्पोरेट लूक’

यामुळे दिवाळीनिमित्त गोडाधोडाचे पदार्थ तयार करण्यासाठी गरीब कुटुंबीयांना त्याचा फायदा होणार आहे. पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक दुर्बल कुटुंबे आहेत. त्यांना सण साजरे करताना हात आखडता घ्यावा लागतो. महागाईमुळे त्यांना दिवाळी कशी करायची, ही चिंता भेडसावते.

Ration Shop
Ration Card वर आता Fortified Rice मिळणार | Fortified Rice

अशातच पालघर जिल्ह्यातील पुरवठा विभागाने अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या शिधापत्रिकाधारकांची यादी तयार करून आवश्यक शिधा जिन्नस संच तयार केले आहेत. दिवाळीत बेसनाचे लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळ्या, करंजी यासह विविध पदार्थ तयार केले जातात; परंतु महागाईमुळे गोरगरिबांना मात्र यापासून दूर राहावे लागते.

त्यामुळे राज्य शासनाने यंदा अशा घटकांना दिवाळीची गोड भेट दिली आहे. योजनेमुळे जिल्ह्यातील गरजूंची यंदाची दिवाळी आनंदात जाणार आहे.

अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेतील चार लाखांहून अधिक शिधापत्रिका धारकांना रवा, तेल, चणाडाळ व साखर याचे पॅकेट देण्यात येणार आहे. यासाठी तालुकानिहाय नियोजन केले आहे.

- पी. के. ओमासे,

जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com