सोळा अंगवाड्यांसाठी १ कोटी ८० लाख रुपये

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांची माहिती
सोळा अंगवाड्यांसाठी १ कोटी ८० लाख रुपये
AnganwadiAgrowon

भोर, जि. पुणे ः भोर विधानसभा (Bhor Assembly) मतदारसंघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यांतील १६ अंगणवाड्यांच्या (Anganwadi) इमारतीसाठी जिल्हा परिषदेकडून १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी (fund For Anganwadi) मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.

यामध्ये मुळशी तालुक्यातील सर्वाधिक ९ अंगणवाड्यांसाठी १ कोटी १ लाख २५ हजार रुपये, भोर तालुक्यातील ६ अंगणवाड्यांसाठी ६७ लाख ५० हजार आणि वेल्हे तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी ११ लाख २५ हजार रुपयांच्या रक्कमेचा समावेश आहे. मंजूर केलेल्या अंगणवाड्यांच्या सध्याच्या इमारती वापरासाठी नादुरुस्त झाल्या असून काही ठिकाणी इमारती नाहीत. त्यामुळे अंगणवाडीच्या नवीन इमारतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून प्रत्येक अंगणवाडीसाठी ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे रणजित शिवतरे यांनी सांगितले.

अंगणवाडी इमारती मंजूर झालेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे

ः* मुळशी तालुका - कोंढावळे, कोंढूर बोतरवाडी, भोईनी, लवळे, रिहे, खांबोली, भुकूम-१ आणि भुकूम-२.

* भोर तालुका - मोरवाडी-पाचलिंगे, इंगवली, वडगाव डाळ, हर्णस, वाठार हिंगे व कांबरे ब्रु.

* वेल्हे तालुका - कर्नवडी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com