
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा या गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत (Jaljeevan Mission) पाणी पुरवठ्यासाठी (Water Supply) ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य नितीन वडघुले यांनी दिली आहे.
टाकळी भीमा (ता. शिरूर) या गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत निधी देण्याची मागणी शासकीय पातळीवर करण्यात येत होती. तालुक्याचे आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून शासनाकडून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
त्यामुळे या गावातील पाणी प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या योजनेमुळे गावातील प्रत्येक वाड्या वस्त्यांवर घरोघरी नळ जोडणी करून घरोघरी पाणी मिळणार असल्याने महिला वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
श्री. वडघुले म्हणाले, की या योजनेसाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो. तसेच गावातील इतर सुख सोयींसाठी आम्ही संबंधित विभागांशी पाठपुरावा करत होतो.
या कामासाठी देविदास करपे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र शिंदे, सरपंच कोमल माहुलकर, उपसरपंच सविता घोलप, ग्रामपंचायत सदस्य सुमन वडघुले, सुनंदा काळे, रेणुका गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.