गरजूंना शिधापत्रिकांचा लाभ मिळवून द्यावा

अन्न आयोगाच्या अध्यक्षांचा ग्राहक पंचायतींशी संवाद
गरजूंना शिधापत्रिकांचा लाभ मिळवून द्यावा
Ration cardAgrowon

जळगाव : ‘‘समाजातील निराधार, गरजू, वृद्ध तसेच विधवा परित्यक्ता व अपंगाचे सर्वेक्षण (Handicapped Survey) करून त्यांना शिधापत्रिकांचा (Ration Card) लाभ प्राधान्याने मिळवून दिला पाहिजे. यासाठी ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले.

ढवळे हे सध्या दोन दिवसांच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना अखिल भारतीय ग्राहक पंचायत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजिंठा विश्रामगृह येथे त्यांची भेट घेतली. या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, अमळनेर तालुकाध्यक्ष व प्रांत महिलाप्रमुख भारती अग्रवाल, जिल्हा संघटक जगन्नाथ तळेले, जिल्हा सचिव ॲड. सुभाष तायडे, महिला प्रतिनिधी प्रतिभा सूर्यवंशी, भुसावळ तालुकाध्यक्ष ॲड. कल्पना टेमानी, परिवहन समितीप्रमुख सुरेश तांबे (पाचोरा), चाळीसगाव तालुकाध्यक्ष रमेश सोनवणे, देवेंद्र पाटील, ॲड. देवेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

प्रांत महिला प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल भारती अग्रवाल यांचा, तर ग्रामीण पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष म्हणून परिवहन समितीप्रमुख सुरेश तांबे यांचा ढवळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. अनिल देशमुख यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा संघटक जगन्नाथ तळेले यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com