विकास योजना प्रभावीपणे राबवा ः पालकमंत्री भुमरे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ते, फळबाग लागवड व इतर कुशल-अकुशल प्रकारातील विविध विकास योजनांचा समावेश होतो.
Fruit crop cultivation
Fruit crop cultivationAgrowon

औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ते, फळबाग लागवड (Fruitcrop cultivation) व इतर कुशल-अकुशल प्रकारातील विविध विकास योजनांचा समावेश होतो. या विकास योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयोअंतर्गत जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या विकास कामाचा तालुकानिहाय आढावा पालकमंत्री यांनी घेतला. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांच्यासह सर्व तहसीलदार आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

श्री. भुमरे म्हणाले, की जिल्ह्यात रोहयोअंतर्गत कामागारची संख्या, नोंदणी जॉबकार्ड, कामगारांची उपस्थिती, ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज, प्रत्यक्ष पूर्ण झालेली काम व अपूर्ण काम सात दिवसांच्या आत सुरू करा.

Fruit crop cultivation
Crop damage : देवळ्यात ३० क्विंटल मका कणसे खाक

तालुकानिहाय आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावरुन घेण्याबाबतची सूचनाही मंत्री भुमरे यांनी केली. नऊ तालुक्यात पूर्ण झालेले व उर्वरित मंजूर रोहयोचे कामाच्या बाबतीत पंधरा दिवसाच्या आत घेतला जाईल. यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशाराही संबंधित यंत्रणेला पालकमंत्री यांनी दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com