श्रीलंकेच्या कर्ज मर्यादेमध्ये भारताने केली ५५ दशलक्ष डॉलरची वाढ

भारत सरकारने श्रीलंकेसाठी कर्ज मर्यादा वाढवली आहे. श्रीलंकेला युरियाच्या खरेदीसाठी 55 दशलक्ष डाँलरची कर्ज मर्यादा वाढवण्यात आली आहे.
श्रीलंकेच्या कर्ज मर्यादेमध्ये भारताने केली ५५ दशलक्ष डॉलरची वाढ
SrilankaAgrowon

भारत सरकारने (India) श्रीलंकेसाठी (Srilanka) कर्ज मर्यादा वाढवली आहे. श्रीलंकेला युरियाच्या (Urea) खरेदीसाठी 55 दशलक्ष डाँलरची कर्ज मर्यादा वाढवण्यात आली आहे. श्रीलंकेतील आर्थिक आणीबाणीच्या (Emergency) पार्श्वभूमीवर तातडीची मदत श्रीलंकेने मागितली होती. त्यामुळे भारताने कर्ज मर्यादेमध्ये वाढ केली आहे. या संदर्भात ‘जीओेएसएल’ आणि ‘एक्सपोर्ट- इम्पोर्ट बँक आॅफ इंडिया’ यांच्यात 10 जून रोजी करार करण्यात आला. यावेळी श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, कृषी मंत्री महिंदा अमराविरा आणि श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले उपस्थित होते.

श्रीलंकेमध्ये सध्या सुरू असलेल्या भात पेरणीच्या हंगामासाठी युरिया खतांची मदत महत्त्वाची आहे. युरियाची गरज लक्षात घेऊन श्रीलंका सरकार आणि ‘इएक्सआयआम’ बँक सर्व खरेदी प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार आहे. जेणेकरून युरियाचा पुरवठा कमी वेळेत श्रीलंकेत होऊ शकेल.

या कराराच्या वेळी श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी भारताचे आभार मानले. यावेळी भारतीय उच्चायुक्त म्हणाले की, “भारत सरकार श्रीलंकेतील लोकांच्या कल्याणासाठी किती महत्त्व देते याची साक्ष श्रीलंकेच्या कर्ज मर्यादेमध्ये तातडीने केलेली वाढ देते.”

पुढे ते म्हणाले, “आपल्या ‘नेबरहुड फर्स्ट' म्हणजे ‘शेजारी राष्ट्र पहिल्यांदा’ धोरणानुसार आणि श्रीलंकेचा एक प्रामाणिक मित्र व भागीदार या नात्याने भारताने गेल्या काही महिन्यांमध्ये श्रीलंकेतील लोकांना मदत केली आहे.” भारताने श्रीलंकेला ३.५ बिलीयन डॉलरची आर्थिक मदत केली आहे. तसेच श्रीलंकेला अन्न, आरोग्य आणि ऊर्जा सुरक्षिततेसाठी अन्न, औषधे, इंधन आणि रॉकेल इत्यादी आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी भारताने पुढाकार घेतलेला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com